esakal | अप्पारावपेठ ते तेलंगणाला जोडणाऱ्या पूलाची उंची वाढवा- नागरिकांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

हाच तो शिवणी ता. किनवट कमी उंचीचा पूल

अप्पारावपेठ ते तेलंगणाला जोडणाऱ्या पूलाची उंची वाढवा- नागरिकांची मागणी

sakal_logo
By
विठ्ठल लिंगपूजे

शिवणी (जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या अप्पारावपेठ या भागातील नागरिकांना तेलंगणात व महाराष्ट्रात ये- जा करण्यासाठी वापरात असणाऱ्या अप्पारावपेठ ते गोंडजेवली नाका या रस्त्यावर कमी उंचीचा पुल आहे. पावसाळ्यात मोठा पाऊस झाला की, या परीसरातील नागरिकांना पुरांमुळे वारंवार अडखळून पडावे लागते. त्यासाठी या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी किनवट तालुक्यातून होत आहे.

किनवट तालुक्यात मान्सूनने सुरुवातीलाच जोर धरल्याने अनेक वेळा या परिसरातील वाहतूक ठप्प होत आहे. कारण या रोडवरच्या पुलाची उंची कमी असल्याने या भागातील नाल्याला जंगलात पडलेल्या पावसाचे पाणी येत असल्याने पुर येत असतो. या परिसरातील गावांना जवळची बाजारपेठ तेलंगणातील निर्मल ही असून या परिसरातील गावांना हा रस्ता मुख्य आहे. या रस्त्याशिवाय या गावांना दुसरा पर्याय नाही. नाल्यावरील पुल हा पाईप टाकून बनवला आहे मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नेहमी वाहतुक खोळंबली जाते.

हेही वाचा -

या नाल्यावर पुलाची उंची कमी असल्याने या रस्त्यावर पुराचे पाणी वारंवार येते. त्यामुळे वाहन चालकासह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच शेतीचे नुकसान होत आहे. त्या ठिकाणी उंच खांबी पुल होणे आवश्यक आहे. गेल्या अनेक दिवसापासून या परिसरातील नागरिकांची हा पूल करण्यात यावा यासाठी मागणी केली आहे. पावसाळ्यात या परिसरातील होणारे नागरिकांचे गैरसोय विचारात घेता या ठिकाणी पुल उभारणे गरजेचे झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image