बी-बियाणे, खतांच्या किंमतीत वाढ

यंदाचा खरीप महागडा; सोयाबीन बॅग ९५०; डीएपीची गोणी १५० रुपयांनी महागली
fertilizer
fertilizerSakal

नांदेड - यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी तुलनेने महाग ठरणारा आहे. बियाणे व खतांच्या किंमतीतील दरवाढीसोबतच मशागत, पेरणी व नंतरची कार्ये याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोयाबीनच्या दरात यंदा चांगलीच वाढ झाली असून युरीया वगळता उर्वरित सर्वच खतांच्या किमती तडकल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून सोयाबीन व कपाशी ही मुख्य पिके खरिपात घेतली जातात. जिल्ह्यात मशागती करून शेत पेरणीसाठी तयार झाले आहे. प्रतीक्षा दमदार पावसाची असून अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी बियाणे व खतांसाठी बाजारपेठेत चौकशी सुरु केली आहे. काहींनी आगाऊ खरेदीही सुरु केली. यंदा बियाणे व खतांच्या किमतीतील दरवाढ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सोयाबीनच्या दरामध्ये गतवर्षीच्या तुलनेत प्रतिबॅग ८३० ते ९५० रुपये तर कपाशीच्या बियाण्यामध्ये ४३ रुपयांची वाढ झाली आहे.

युरिया वगळता सर्वच खतांच्या किंमतीत वाढ

यंदा युरिया वगळता उर्वरित सर्वच खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. गतवर्षी युरियाची ४५ किलोची गोणी २६६ रुपयांची होती. यंदाही त्याच भावात उपलब्ध आहे. तर सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताची किंमत ३५० रुपयांनी वाढली आहे. एमओपीचे दर ७३० रुपये, अमोनियम सल्फेट ३०० रुपये, १५ः१५ः१५चे दर दोनशे रुपये, २०ः२०ः००चे दर २९० रुपयांनी तर एसएसपीच्या दरात ४३ रुपयांनी वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com