व्यावसायिकांची चिंता वाढली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient
व्यावसायिकांची चिंता वाढली...

व्यावसायिकांची चिंता वाढली...

नांदेड : कोरोना संसर्गामुळे (corona patient) मागील दोन वर्षापर्यंत कमी अधिक प्रमाणात लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कच्च्या मालावर आधारीत लहान मोठ्या उद्योग, व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केली नव्हती. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने काही महिन्यापूर्वीच जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालय, मंदीरे सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. त्यामुळे दिवाळी व नवीन वर्षा दरम्यान कच्च्या मालाची खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, अचानक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्याने व्यापारी, व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा: मराठीचा वापर करण्याची सूचना देणारा आदेशच इंग्रजीमध्ये

जिल्ह्यात मोठे उद्योग समुहाची संख्या अतिशय बोटावर मोजण्याइतकी आहे. मात्र, शेती व शेतीपूरक व्यवसाय कच्च्या मालावर आधारीत उद्योग धंदे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यासाठी लागणारा कच्चा माल राज्यासह परराज्यातून मागवावा लागतो. त्यासाठी व्यवसायीकांना कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. तेव्हा कच्चा माल पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे कापड व्यवसाय, स्टील इंडस्ट्री (पत्रे कारागीर), केंटरिंग, पार्लर, जीम, सलून, कृषीवर आधारीत उद्योग, दुग्धजन्य पदार्थ हाताळणी व विक्री, रेडिमेट क्लस्टर, आर्ट ज्वेलरी अशा अनेक लहान मोठ्या व्यवसायात नव तरुणांनी मोठ्या आशेनी गुंतवणूक केली आहे.

त्यांचा व्यवसाय नावारुपाला आला असतानाच कोरोनाने अनेकांना जेरीस आणले होते. दरम्यान, बँकेचे कर्जाचे हप्ते, दुकान भाडे, कामगारांवर होणारा खर्च, लाईटबील परवडनासे झाल्याने अनेकांना व्यवसाय बंद करावे लागले आहेत. असे असले तरी, अनेक उच्च शिक्षितांनी आशावादी राहून कोरोनातही व्यवसाय टिकवून ठेवण्याची धडपड सुरुच ठेवलेली आहे.

हेही वाचा: खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या मुलासह वडिलांचा खून

मात्र, नवीन वर्षात कोरोनाची दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर करत लग्न, केटरिंग, पार्लर, जिम, खासगी क्लासेस, शाळा, महाविद्यालयासोबतच लहान मोठ्या उद्योगांवर देखील मर्यादा आणल्याने जिल्ह्यातील व्यावसायिक, व्यापारी वर्गाची चिंता वाढवली आहे. गुंतवलेले पैसे काढायचे कसे? हा त्यांच्या समोरील सर्वात मोठा प्रश्‍न आहे.

"तसे पाहिले तर लोकांच्या दृष्टीने फेटे बांधणे हा काही फार मोठा व्यवसाय वाटत नाही. मात्र पुणे, मुंबईच्या तोडीस तोड म्हणून आम्ही नांदेड शहरात फेटा व्यवसायात मोठी गुंतवणूक करुन दुकान उभारले आहे. त्यासाठी विविध राज्यात प्रसिद्ध असणारे फेटे मागवतो. मागील दोन वर्षापासून फारशी कमाई झालेली नाही. गुंतवलेले पैसे देखील व्यवसायातुन परत मिळाले नाहीत. दिवाळीनंतर कोरोना संपेल, अशी अपेक्षा होती. त्या दृष्टीने लग्न सराईच्या मुहूर्तावर फेटे खरेदीत मोठी गुंतवणूक केली. त्यात कोरोनाची नवीन नियमावली लागू झाल्यापासून लग्न समारंभ, सांस्कृतीय कार्यक्रमावर मर्यादा आल्याने काळजी वाटत आहे."

- सुहास हटकर, फेटे व्यावसायीक, नांदेड.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top