रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ; केंद्र सरकारने दरवाढ मागे घेण्याची मागणी

सद्यस्थितीत कोरोना, लॉकडाउन, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खताच्या भाववाढीने आर्थिक संकटात टाकले आहे
रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ; केंद्र सरकारने दरवाढ मागे घेण्याची मागणी
रासायनीक खताचा साठा

नांदेड ः यंदा रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले असून खत कंपन्यांनी (chemical) प्रत्येक खताच्या पोत्यामागे दीडपट भाववाढ केली आहे. ही भाववाढ शेतकऱ्याचं आर्थिक (Farmer in tention) कंबरडे मोडणारी असून केंद्र सरकारने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. Increase in the price of chemical fertilizers increases the crisis of farmers; Central government demands withdrawal of tariff hike

सद्यस्थितीत कोरोना, लॉकडाउन, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खताच्या भाववाढीने आर्थिक संकटात टाकले आहे. रासायनिक खताची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी भाववाढ केली. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खताची गरज ओळखून खत निर्मिती कंपन्यांनी दरवाढ केल्याचे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रामध्ये रासायनिक खताचा पिकांसाठी वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे भाववाढीचा जबर फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे. जवळपास सर्वच कंपन्यांनी खताचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अव्वाच्या सव्वा वाढवुन ठेवलेत. असे असताना केंद्रशासनाने कुठलीही दरवाढ मागे घेतली नाही किंवा तसे आदेश सुद्धा खत कंपन्यांना दिले नाही. परिणामी शेती पिकवणे आता शेतकऱ्यांना जिकिरीचे बनले आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांच्या जशा किंमती वाढल्या त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे कसे शेतकरी सुधरतील आणि कसे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल? असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत.

हेही वाचा - नांदेड जिल्हा कोरोनामुक्तीकडे : 273 व्यक्ती बाधित तर नऊ जणांचा मृत्यू

सर्व खासदारांनी आवाज उठवावा

यावर्षी खत उत्पादक कंपन्यांनी भरमसाठ वाढ केल्याने शेतकरी हैराण झाला. त्यामुळे खताच्या वाढलेल्या किंमती रद्द करण्यासाठी सर्व खासदारांनी केंद्र शासनावर दबाव आणण्याची वेळ आली आहे.

- भागवत देवसरकर, प्रदेशाध्यक्ष (पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद)

रासायनिक खतांचे जुने व नवीन दर

खतांचा प्रकार ------------ जुने दर -------------- नवीन दर

इफको-

१०ः२६ः२६ ---------- ११७५ ------- १७७५

१२ः३२ः९६ -------- ११९० ------- १८००

२०ः२०ः० -------- ९७५ --------- १३५०

डीएपी ------------- ११८५ ------- १९००

आयपीएल

डीएपी ----------- १२०० ------------- १९००

२०ः२०ः० ------------- ९७५ ------------- १४००

पोटॅश ----------- ८५० ------------- १०००

महाधन

१०ः२६ः२६ ----------- १२७५ ------------ १९२५

स्मार्टटेक

२४ः२४ः० ---------- १३५० -------- १९००

२०ः२०ः०ः१३ ---------- १०५० ------------ १६००

जीएसएफसी (सरदार)

१०ः२६ः२६ ----------- ११७५ ------------ १७७५

१२ः३२ः१६ ----------- ११९० ------------- १८००

२०ः२०ः०ः१३ ----------- १००० ------------ १३५०

डीएपी ----------- १२०० ----------- १९००

सुपर फॉस्फेट ------------ ३७० ---------- ४७०

पावडर

सुपर फॉस्फेट -------- ४०० ------------ ५००

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com