लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्य सेविकांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; मुक्रमाबादमध्ये गुन्हा दाखल

राज्यात कोरोना या महामारीमुळे हाहाकार उडाला असल्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग हा आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून दिवसराञ काम करत आहे.
क्राईम न्यूज
क्राईम न्यूज

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : कोरोना महामारीवर नियंत्रण (Corona virus controling) मिळविण्यासाठी आरोग्य कर्मचारी हे आपल्या जीवाची बाजी लावून गावोगाव फिरुन कोविशिल्ड व लहान बाळांना लसीकरण (Vaccination) करण्यासाठी जात आहेत. मात्र अशाच गेलेल्या कर्मचाऱ्यांना माञ मुखेड तालुक्यातील सावरमाळ (Mukhed savarmal health center) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या बेन्नाळ येथे आरोग्य सेविकेसह आशा वर्कर व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना (ता. १२) रोजी घडली. या प्रकरणी एका विरुद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Insulting staff, including health workers who went for vaccinations; Filed a case in Mukramabad)

राज्यात कोरोना या महामारीमुळे हाहाकार उडाला असल्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग हा आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून दिवसराञ काम करत आहे. माञ लसीकरण करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना गावातील काही महाभाग आर्वाच्या भाषेत शिवीगाळ करुन, वाद घालून परत पाठवत आहेत. लसीकरण करण्यासाठी गेलेल्या आरोग्य सेविका संगिता चटलावर, आशा वर्कर बबीता मलेलवाड, मल्लेरीया प्रायमरी वर्कर वाघमारे, मदतनीस दोंडूबाई बाजगीरे हे कर्मचारी गावातील घरोघरी जाऊन लस देत होते.

हेही वाचा - कोरोना पार्श्वभूमीवर अनाथ बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स

त्यावेळी गावातील श्रीरंग व्यंकट गजले हा तिथे येऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना फुकटची पगार घेता. नोकरी करत नाही. असे म्हणत आश्लिल भाषेत शीवीगाळ करत कोविशिल्ड व दीड वर्षाच्या बाळास लस देत असताना कामात अडथळा निर्माण करुन आरोग्य कर्मचाऱ्यांना गावातून हाकलून दिल्याची फिर्याद आशा वर्कर बबीता मलेलवाड यांनी दिल्यावरुन श्रीरंग व्यंकट गजले यांच्या विरोधात मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या महामारीत आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन जीव धोक्यात घालून कोविशिल्ड व लहान बाळाची लस देत आहोत. पण या राष्ट्रीय कार्यक्रमात आम्हांला नागरिकांचे सहकार्य मिळण्याऐवजी विनाकारण टोकाचा विरोध होत आहे. हे फारच दुर्देवी आहे.

- डॉ. जगदीग गायकवाड रावीकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरमाळ.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com