Valentine Day Special : आंतरजातीय प्रेमविवाहास’ सुखी संसाराची जोड
Inter caste Marriage : २००३ मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह करणारे नरसी येथील साईनाथ फुलचवाड आणि अकलूज येथील अनुपमा बन यांनी २२ वर्षांची यशस्वी सहजीवनाची जोड दिली आहे. कुटुंबीयांचा विरोध, टोमणे आणि तिरस्कार यावर मात करून त्यांनी एकमेकांना साथ दिली.
नायगाव : डिएडला असताना ते दोघे एकमेकांंच्या प्रेमात पडले. लग्नास कुटुंबीयांचा विरोध होता मात्र दोघांनी २००३ मध्ये आंतरजातीय विवाह केला. पुढील वाटचाल सोपी नव्हती. टोमणे, तिरस्काराची वागणूक सहन केली.