नांदेड : बदलती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज व्हावे : खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे  

Nanded News
Nanded News

नांदेड : ‘‘कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर पत्रकारीता केली पाहिजे. पत्रकारिता करताना नवा वाचक वर्ग निर्माण करणे ही आजची आव्हाने आहेत. त्यामुळे पत्रकारितेतून सकारात्मक विचार मांडा. लोकांना आवडेल तेच छापा. एकंदरीतच माध्यम क्षेत्रातील बदलती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज राहावे, असे मत खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. भाजपतर्फे दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यामध्ये ते शनिवारी (ता.नऊ) बोलत होते. 

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले की, चांगला बदल हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असतो. खरेतर कामगार कपातीमुळे आज अनेकांचा रोजगार बुडाला म्हणून हताश होण्याची गरज नाही. तर पत्रकारिता प्रगल्भ करण्याची गरज आहे. जो बदल होत आहे तो समाजापुढे आला पाहिजे. बातमीच्या जुन्या परंपरेत न अडकता सकारात्मकता असणारी बातमी लोकांपुढे आली पाहिजे. निराशाजनक पत्रकारिता कमी होणे आवश्यक आहे. लोकहिताच्या बातम्यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी माध्यम तज्ज्ञ डॉ. समिरण वाळवेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, माजी आमदार अविनाश घाटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी व्यंकटेश चौधरी आणि प्रल्हाद उमाटे यांनी केले. 

पत्रकारांनी स्वतःमध्ये बदल घडवावा 
सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया वर्तमानपत्रांसाठी भविष्यात घातक आहे. त्यामुळे आत्ताच प्रत्येक पत्रकाराने तंत्र अवगत करण्याची गरज आहे. कोरोनामुळे ४० टक्के नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हताश न होता स्वतः वर्तमानपत्र काढून स्वतःमध्ये सकारत्मक बदल घडवावा. पत्रकारांनी माध्यम प्रतिनिधी म्हणून काम करावे. सद्यस्थितीमध्ये चॅनेलवरील चर्चा सत्र बंद होत आहेत. भविष्यात रोजगार कमी होणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी स्वतःमध्ये बदल घडवावा. 
- डॉ. समीरण वाळवेकर, माध्यम तज्ज्ञ. 

अखंडित सन्मान करणार 
गत वर्षापासून पत्रकारांचा सन्मान करण्याची संकल्पना प्रत्यक्षामध्ये सुरु केली आहे. त्यामुळे यापुढील काळामध्येही खासदार असो वा नसो अखंडित पत्रकारांचा सन्मान दर्पण दिनाच्या निमित्ताने करणार आहे. 
- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार (नांदेड लोकसभा मतदारसंघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com