esakal | वडीलानंतर अवघ्या दीड तासात मुलगा कोरोनाने हिरावला; लोह्यातील हृदयद्रावक घटना

बोलून बातमी शोधा

बाप- लेकांचा मृत्यू

लोह्यातील हृदयद्रावक घटना; वडीलानंतर अवघ्या दीड तासात मुलगा कोरोनाने हिरावला

sakal_logo
By
बा. पू. गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : वेळ- काळ किती क्रूर झाली आहे ..अनेक घरात अश्रुंचे पाट वाहताहेत.. दैवाचा का खेळ .. कधी संपणार ..? अस म्हणत देवाकडे याचना करणारे हात आता अंत्ययात्रेत सहभागी होत आहेत..लोह्यात एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती थोड्याच दिवसाने एकापाठोपाठ दगावण्याची चार घटना ताज्या अस्तानाच शनिवारची (ता. २४) सकाळ लोहा वासीयांसाठी मन सुन्न करणारी होती. राजूरवार हाळदेकर परिवारात वडील व मुलगा यांचे अवघ्या दीड तासाच्या अंतराने दुःखद निधन झाले ..हृदय पिळवळून टाकणारी ही घटना लोहा वासीयांसाठी वेदनादायी ठरली..वडील व भाऊ दोघांच्या सरणाला अग्नी देण्याचं दुर्भाग्य बालाजीच्या वाटेला आलं.

जुन्या लोह्यात राहणारे राजेंद्र राजूरवार हाळदेकर यांच्या कुटुंब. गेल्या २०- २५वर्षा मुक्ताईनगरात राहत होते ..अरुण, पांडूरंग, ज्ञानेश्वर, बाबू व गजानन अशी पाच भावंड ...सगळी कष्टकरी. त्यात अरुण राजेंद्र राजूरवार हाळदेकर ( वय ५५) सर्वात मोठा. तो लोह्यातील मोंढ्यात दुकानावावर मुनीम म्हणून दीर्घकाळ होता. त्यांचा मुलगा साईनाथ ( वय २५ वर्ष, अविवाहित) हा बाजारहाट करायचा शांत व सहकार्यवृत्तीचे हे कुटुंब. पण काळाने.. नियतीने या परिवारावर ..घाला घातला.

पिता अरुण व मुलगा साईनाथ दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. नांदेडला खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ऑक्सिजन लेव्हल कमी झाले. धाकटा भाऊ गजानन राजूरवार व हाळदेकर परिवाराने यांनी आपल्या भाऊ व पुतण्या वाचवा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अरुण राजेंद्र राजूरवार ( वय ५५ ) यांनी जगाचा निरोप घेतला तर त्यांचा मुलगा साईनाथ अरुण राजूरवार ( वय २५ वर्षे) यांनीही पित्याच्या मरणानंतर अवघ्या दीड तासात जग सोडले..ही हृदयद्रावक घटना सकाळी कळताच अख्ख लोहा शहर सुन्न झालं..

आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेल्लवार व प्रमुख राजूरवार कुटुंबाच्या मदतीला धावले. भूषण दमकोंडावार, संगम देबडवार, गजानन कवठेकर, विनोद पारसेवार, विनोद लोढा या तरुणांनी राजूरवार पिता पुत्राच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या दोघांच्या सारणाची तयारी केली. बालाजी राजूरवार यांनी वडील व भाऊ यांच्या प्रेताला अग्नी दिला.. एकच वेळी वडील व भाऊला चिता देण्याची ही कोरोना काळातली पहिलीच घटना होय. त्यांच्या पश्चात पत्नी मंगल, मुलगा बालाजी ( वय २०) व मुलगी सोनू तसेच भाऊ भावजयी, पुतणे असा मोठा परिवार आहे

एकाच कुटुंबातील दोघे जाण्याची पाचवी घटना

कोविडने दीड महिन्यात लोहा शहरात एकाच कुटुंबातील दोघेजण जाण्याची ही पाचवी घटना. मार्च महिन्यात शिक्षक प्रशांत मोटरवार यांच्या यानंतर त्याची आई आठ दिवसात गेली. फोटोग्राफर भीम पातेवार यांचे मोठे भाऊ गेले त्यानंतर दहा दिवसांत स्वतः भीम पातेवार दगावले. प्राथमिक शिक्षक कैलास पांचाळ यांच्या आई गेल्या नाते अवघ्या चार दिवसात पांचाळ गुरुजी गेले. कांग्रेसचे ज्येष्ठ ऍड. शिवाजीराव बोरगावकर यांचे व त्यांच्या पत्नीचे दोन दिवसांच्या अंतराने दुःखद निधन झाले. या चार घटना ताज्या असतानाच लोह्यात राजूरकर पिता- पुत्रांची अवघ्या दीड तासात त्यांनी जगाचा निरोप घेतला. या हृदयद्रावक घटना खूपच वेदनादायी.. क्लेशदायी ..निशब्द घडल्या

सर्वात तरुण व्याचा कोरोनाचा पहिला बळी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांच्या बळींची संख्या वैद्यक क्षेत्राला मोठे आव्हान ठरले आहे. लोह्यात या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले यात साईनाथ अरुण राजूरवार हाळदेकर ( वय २५) हा सर्वात तरुण कोविड मुळे दगावला. कमी वयाच्या या तरुणीच्या जाण्याने समाजमन पुन्हा एकदा सुन्न झाले आहे. काळजी घ्या..विनाकारण फिरु नका..मास्क वाफर..लस घ्या ..जान है... तो जिहान है। हा संदेश पाळा अस आवाहन करण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे