

Nanded News
esakal
कंधार: कंधारहून कुरुळाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम सध्या सुरू असले तरी घोडज ते पातळगंगा या दरम्यान टाकण्यात आलेल्या गिट्टीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून येथून जावे लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे.