नांदेड : ‘जगतुंग’ भरल्याने घबराट : १९८३ ची पुनरावृत्ती होणार?

प्रशासनाने दखल घेण्याची गरज
kandhar heavy rain
kandhar heavy rain

कंधार - १९८३ सालच्या पावसाळ्यात जोरदार वृष्टी होऊन सगळीकडेच पाणीच पाणी झाले होते. जगतुंग समुद्र (तलाव) टच भरला होता. जगतुंगच्या कट्ट्याला मोठ- मोठ्या भेंगा पडल्या होत्या. या मुळे पायथ्यालगतच्या कोटबाजार गावातील घरात झरे सुरू झाले होते. नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने कोटबाजारसह इतर गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. ४० वर्षानंतर पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगतुंग समुद्र शंभरटक्के भरल्याने कोटबाजारसह इतर गावातील नागरिकांत घबराट पसरली असून प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे. कंधार शहर पूर्वी राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे शहर होते. राष्ट्रकूट राजांनी याठिकाणी हजार-बाराशे वर्षांपूर्वी जगतुंग तलावाची निर्मिती केली. वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या जगतुंगचा विस्तार समुद्रासारखा असल्याने पुढे त्याला जगतुंग समुद्र असे नाव पडले. जगतुंग हे शहरातील मोठे पाण्याचे स्रोत आहे.

तसेच जगतुंगमुळे परिसरातील शेकडो हेक्टर जमीन सुद्धा ओलिताखाली येते. यंदा जोरदार पाऊस झाल्याने जगतुंग शंभरटक्के भरला आहे. १९८३ मध्ये जगतुंग असाच भरला होता. त्यावेळी कट्याला भेंगा पडल्याने नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले होते. अद्याप दोन महिने पावसाळा शिल्लक असून पुन्हा १९८३ ची पुनरावृत्ती होते की काय असे चित्र आहे.

ऑगस्टमध्येच पाऊस सरासरीच्या जवळ आला. तालुक्याची पावसाची सरासरी ८०२ मिलिमीटर आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला ७२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे जगत्तुंग तलावाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. दोन महिन्याचा पावसाळा बाकी आहे. जगतुंगात असलेले दोन्ही कालवे बंद असल्याने पाण्याचा विसर्ग थांबला आहे. यामुळे जगतुंगच्या कट्याला भेंगा पडत आहेत. जगतुंग लगतच्या घरांना ओलावा जाणवत आहे. पुढील दोन महिने पावसाने बॅटिंग अशीच सुरू ठेवली तर कोटबाजारसह मानसपुरी, बहाद्दरपुरा, सुजानवाडी आदी गावांना धोका बसण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने कालवे सुरू करावेत

पावसाळा सुरू होऊन अद्याप दोन महिन्याचा कालावधीही झाला नसताना जगतुंग समुद्र पूर्णक्षमतेने भरला आहे. जगतुंग मधील दोन कालवे गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्थितीत आहेत. त्यामुळे जगतुंगची पाण्याची पातळी वाढतच आहे. अशीच पाण्याची पातळी वाढत राहिली तर जगतुंगच्या पायथ्यालगतच्या गावांना नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर दोन दोन्ही कालवे चालू करावेत अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com