‘सप्तरंग’ची काव्यपौर्णिमा यंदा प्रथमच झाली आॅनलाइन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

मानवाचे आरोग्य निसर्गाच्याच हाती आहे. निसर्गाच्या पर्यावरण प्रक्रियेत कमालीचा हस्तक्षेप झाल्याने पर्यावरणाचे संतुलन ढासळले आहे. याचे हानीकारक परिणाम प्राण्यांमधून दिसून आले आहेत.

नांदेड : आज कोरोनामुळे अवघ्या जगाची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. जगातल्या अनेक देशांत कोरोना संसर्गाचा फैलाव हाताबाहेर गेलेला आहे. पर्यावरणातील जैविक स्वरुपाचे घातक बदल मानवी आरोग्यावरही परिणाम करतात. कित्येक विषाणू जनुकीय परिवर्तन करुन प्राण्यांतून माणसांत येतात. म्हणजेच प्रदुषित पर्यावरणामुळे कोरोनासारखे विषाणू जन्माला येतात.

सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने ‘थेंब थेंब कविता’ या काव्यपौर्णिमा या कार्याक्रमाचे आयोजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले होते. मंडळाच्या वतीने दरपौर्णिमेला लोकांच्या प्रत्यक्ष सहभागाने काव्यपौर्णिमा या कविसंमेलन घेतले जाते यंदा एकोणतिसावी काव्यपौर्णिमा ही कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आॅनलाईन पद्धतीने झूम अॅपद्वारे साजरी करण्यात आली. 

हेही वाचा - ‘गड्या आपला, गावच बरा’ म्हणत शहर झाले खाली....कुठे ते वाचा

मानवाचा निसर्गातील अघोरी हस्तक्षेप
गंगाधर ढवळे सांगतात की, पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण केले की आपली जबाबदारी संपत नाही. वृक्षसंवर्धनातूनच पर्यावरणाचे संरक्षण होते. शुद्ध, समृद्ध पर्यावरणच मानवी आरोग्य उत्तम आणि सात्विक ठेवू शकते. मानवाच्या निसर्गातील अघोरी हस्तक्षेपामुळेच कोरोनासारख्या विषारी विषाणूचा जन्म झाला आहे. हा हस्तक्षेप कमी झाला नाही तर इतर अनेक विषाणू जन्माला येऊन मानवी जीवनच धोक्यात येवू शकते.  

हे देखील वाचलेच पाहिजे - सुखद : सचखंड गुरुद्वारासाठी आले १७ ट्रक गहू, कुठून ते वाचा

‘एक झाड-एक कविता’ उपक्रम
सप्तरंगी साहित्य मंडळाकडून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी`(ता.पाच जून) ‘एक झाड - एक कविता’ हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील मालेगाव रोड लगतच्या पवननगर परिसरामध्ये अनंत नातेवार, गंगाधर ढवळे, पांडूरंग कोकुलवार यांच्या हस्ते एक झाड लावून काव्यपौर्णिमेचे उद्‍घाटन झाले. त्यानंतर आॅनलाईन झालेल्या कविसंमेलनात कवींनी सहभाग नोंदवून पर्यावरणासंबंधी प्रबोधन करणाऱ्या दर्जेदार कविता सादर केल्या. 

येथे क्लिक कराच - महावितरण : प्रकाशपर्वाची यशस्वी 15 वर्षे- वाचा सविस्तर

आॅनलाइन कविसंमेलनात शरदचंद्र हयातनगरकर यांनी दोन कवितांचे सादर केल्या. काव्यपौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी अनुरत्न वाघमारे होते. सूत्रसंचालन पांडूरंग कोकुलवार यांनी तर आभार गंगाधर ढवळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी साहित्यिक गंगाधर ढवळे यांच्यासह अनुरत्न वाघमारे, पांडूरंग कोकुलवार, नागनाथ कोंडापुरे, शरदचंद्र हयातनगरकर, बाबुराव पाईकराव, मिनाक्षी अंकमवार, आकाश कोकुलवार, संदीप फलटणकर, सोनाली फलटणकर, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, मारोती कदम, प्रशांत गवळे, मारोती कदम, शंकर गच्चे, पंचफुला वाघमारे आदींनी पुढाकार घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kavyapoornima Of 'Saptarang' Went Online Nanded News