esakal | खरीप पेरणीला झाली सुरवात.....कुठे ते वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

NND16KJP01.jpg

जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. हा पाऊस जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला प्रारंभ केला. यामध्ये सुरुवातीला ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस तसेच हळद लागवडीला प्रारंभ केला. यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पिकांच्या पेरणीला प्रारंभ केला आहे.

खरीप पेरणीला झाली सुरवात.....कुठे ते वाचा 

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात मागील चार - पाच दिवसापासून मोसमी पावसाचे आगमन समाधानकारक हजेरी आवल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला प्रारंभ केला आहे. प्रारंभी पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी हळद तसेच कपाशीची लागवड सुरू केली होती. त्यानंतरही पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग यासह इतर खरीप पिकांची पेरणी सुरू केली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७ मिलीमीटरनुसार वार्षीक सरासरीच्या १०.९५ टक्के पावसाची नोंद झाली. कृषी विभागानेही जिल्ह्यात खरीप पेरणी सुरू झाल्याची माहिती दिली.

सलग पावसामुळे पेरणीला प्रारंभ
जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. हा पाऊस जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला प्रारंभ केला. यामध्ये सुरुवातीला ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस तसेच हळद लागवडीला प्रारंभ केला. यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पिकांच्या पेरणीला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. १५) सर्वच तालुक्यात पाऊस झाला. मंगळवारी (ता. १६) सकाळी सरासरी १६.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या १०.९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

हेही वाचा....स्वराज्य संस्थापिका : राष्ट्रमाता जिजाऊ

आठ लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज
जिल्ह्यामध्ये सात लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. यात चार लाख हेक्‍टरवर सोयाबीन तर दोन लाख हेक्‍टरवर कापूस लागवड होईल असा अंदाज आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी खते, बियाणे खरेदी करून पेरणीपूर्व कामे आटोपली होती. यानंतर मागील आठवड्यात पावसाने पहिल्या सलग हजेरी लावल्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. मोसमी पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक झालेला दिसून येत आहे. 

हेही वाचलेच पाहिजे.....११७ कोटी रुपयांचे दोन लाख ३२ हजार क्विंटल धान्य खरेदी....कुठे ते वाचा

तालुकानिहाय झालेला पाऊस
(पाऊस मिलीमीटरमध्ये) 
नांदेड ३१.२५, मुदखेड व अर्धापूर प्रत्येकी १५, भोकर १६, उमरी २७, कंधार ११.६७, लोहा २७.३३, किनवट १७.५७, माहूर २५.२५, हदगाव ९.७१, हिमायतनगर आठ, देगलूर ५.६७, बिलोली १०.२०, धर्माबाद १८.६७, नायगाव ११.२०, मुखेड १७.७१ मिलिमीटर पाऊस झाला.

काही मंडळात जोरदार पाऊस 
लोहा तालुक्यातील कलंबर मंडळात सर्वाधिक ६३, मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तुप्पा मंडळांमध्ये ५२, मिलिमीटर पाऊस झाला. धर्माबाद ३२, मांडवी ४२, दहेली ४६, उमरी ४१, सिंधी २५, देगलूर २३, जांब २५, जाहूर २४, नांदेड शहर २९, विष्णुपुरी २१, वसरणी ३०, नांदेड ग्रामीण २७, वजीराबाद २५, लिंबगाव ३८, धर्माबाद ३२ मिलीमीटर पाऊस झाला.

सर्वच पिकांची पेरणी सुरु
पेरणी योग्य पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्वच पिकांची पेरणी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी कमी पाऊस, आहे अशा ठिकाणी एखादा पाऊस पडल्यानंतर पेरणी सुरु करावी.
- रविशंकर चलवदे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड. 
 

loading image
go to top