esakal | किनवट : शेतकऱ्यांचे एक कोटी ७४ लाख रुपये खात्यावर होणार जमा- खा. हेमंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

केंद्र आणि राज्यसरकारने ऑनलाईन खरेदी पोर्टल सुरु करून प्रलंबित असलेले विक्री केलेल्या मालाचे तब्बल १ कोटी ७४ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. हि रक्कम लवकरच  शेतकऱ्यांच्या खात्यावर  जमा होणार असून ,खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे .

किनवट : शेतकऱ्यांचे एक कोटी ७४ लाख रुपये खात्यावर होणार जमा- खा. हेमंत पाटील

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड  : किनवट तालुक्यातील ज्वारी, मका खरेदी केंद्राचे बंद पडलेले ऑनलाईन पोर्टल  सुरु करून शेतकऱ्यांच्या मालाचे चुकारे तात्काळ वितरित करावेत, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी संसदेत आणि राज्य शासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत केंद्र आणि राज्यसरकारने ऑनलाईन खरेदी पोर्टल सुरु करून प्रलंबित असलेले विक्री केलेल्या मालाचे तब्बल एक कोटी ७४ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार. 

आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने जून २०२० अखेर, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट तालुक्यात शासनाच्या पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करून मका, ज्वारी खरेदी केली होती, पण मध्यंतरी किनवट  तालुक्यात इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे आणि शासनाच्या खरेदी पोर्टलची मुदत संपल्यामुळे नोंदणी झालेल्या मका आणि ज्वारीची लॉट एन्ट्री व शेतकऱ्यांचे बिलाचे पैसे थकीत राहिले होते. 

हेही वाचानांदेड : मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनांसाठी संपर्क साधावा -

शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार

याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी वारंवार पत्रव्यवहार करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालयात भेट घेतली. आणि संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात किनवटच्या मका, ज्वारी खरेदीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून सर्व परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांचे थकीत ज्वारी मका खरेदीचे एक कोटी ७४ लक्ष रुपये मंजूर करून लावकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे.

तालुक्यात ज्वारीसह इतर भरड पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे किनवट तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. तालुक्यात ज्वारीसह इतर भरड पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. शासनाकडून खरेदीही केली जाते. पण मालाचे चुकारे प्रलंबित ठेवून शेतकऱ्यांची हेळसांड केली जाते. परंतु यंदाच्या हंगामात खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चुकारा तात्काळ मिळवून दिला. व शिल्लक राहिलेले मका, ज्वारी खरेदी करण्यास ऑनलाईन पोर्ट्ल पुन्हा सुरु करून घेतले. आता तालुक्यातील शेतकऱ्याचा माल शिल्लक राहणार नाही.  यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.