

Student Found Dead Near Sahastrakund Area
Sakal
ईस्लापूर : परोटी (ता. किनवट) येथील २० वर्षीय शाळकरी विद्यार्थी सहस्त्रकुंड परिसरातील एका पाण्याच्या टाकी जवळ पळसाच्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ डिसेबर मंगळवार रोजी दुपारनंतर उघडकीस आली. रानोजी विलास ऐनलेवाड वय २० असे मृत शाळकरी विद्यार्थाचे नाव असून तो नांदेड येथे शिक्षण घेत होता.