

Nanded News
esakal
इस्लापूर: किनवट तालुक्यात एप्रिल महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ लागली आहे. गावांमधील हातपंप, विहिरी, बोअरवेल यासारखे पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींनी पाणीटंचाई निवारणासाठी किनवट पंचायत समितीकडे अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले असून, त्यापैकी १९ प्रस्तावांना मंजुरी दिल्याची माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे.