Mahashivratri 2025 : लक्ष दिव्यांनी उजळले कोंडलिंगेश्वर; महाशिवरात्री पर्वावर सप्ताहभर कार्यक्रम
Laksh Deepotsav : कोंडलिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने लक्षदीप प्रज्वलित करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घेतला.
तामसा : हदगाव तालुक्यातील शिवपुरी येथील श्रीक्षेत्र कोंडलिंगेश्वर मंदिर परिसर महाशिवरात्र पर्वानिमित्त लक्षदीपारधन महोत्सवाने उजळून निघत आहे. गुरुवारी ता.२० पासून चालू झालेल्या हा नेत्रदीपक अध्यात्मिक सोहळा महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे.