esakal | कृषी ऊर्जा पर्व : आमराबादकरांचा गाव थकबाकीमुक्त करण्याचा संकल्प

बोलून बातमी शोधा

file photo}

श्यामराव व अशोक पाटील अमराबादकर बंधूनी कोरे केले वीजबील, चार लाखांचा भरणा करत 12 लाखांची मिळवली भरघोस सुट.

कृषी ऊर्जा पर्व : आमराबादकरांचा गाव थकबाकीमुक्त करण्याचा संकल्प
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांचा कृषी ऊर्जा पर्वाच्या निमित्ताने कृषिपंप थकबाकीतील विलंब आकार व व्याजाच्या माफीतून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत आमराबादच्या श्यामराव अशोक पाटील अमराबादकर यांनी तब्बल 12 लाखांची सुट मिळवत चार लाख रुपयांचे 35 कृषिपंपाच्या वीजजोडणीचे बील कोरे केले आहे.

मुदखेड उपविभागाअंतर्गत बारड शहर शाखेतील आमराबाद गावात अशोक पाटिल अमराबादकर यांच्या  पुढाकाराने घेतलेल्या कार्यक्रमात महाकृषि वीज अभियानाच्या धोरणची सविस्तर माहीती व फायदे कृषिपंप ग्राहकांना मुख्य अभियंता दत्ताञय पडळकर यांनी आठदिवसांपूर्वी समजावून सांगितले होते. अधिक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा करुन कृषि देयकांच्या थकित रकमा वसुल करतांना कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता पंकज देशमुख, सहाय्यक अभियंता श्री धकाते, व जनमित्रांच्या सहाय्याने आयोजीत केलेल्या बैठकीत अमराबादचे प्रतिष्ठित नागरिक व नांदेड कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्यामराव पाटील तसेच त्यांचे बंधू अशोक पाटील अमराबादकर यांच्या व कुटुंबियांच्या नावे कृषिपंपाच्या 35 वीजजांडण्या असून त्यांच्याकडे 36 लाख रुपये थकबाकी होती. 

यांनी भरली थकबाकी

कृषी ऊर्जा पर्वाच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचा लाभ घेत त्यांनी तब्बल 12 लाखांची भरघोस सुट मिळवत चार लाख रुपयांचा वीज बील भरणा केला आहे. श्यामराव पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी गावातील इतर कृषिपंप धारक शेतकऱ्यांना ऊर्जा पर्वाचे महत्व पटवून देत थकबाकी भरण्यास प्रवृत्त केले. परिणामी कृषिपंपधारक भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक व्यंकटराव कल्याणकर यांनी पन्नास हजार रुपये, दिगांबर कदम यांनी तेवीस हजार रुपये, बालाजी जाधव यांनी एक लाख रुपये, सटवाजी यादव यांनी एक लाख रुपये व बबन महाजन जक्कापुरे यांनी ५२ हजार ५६० रुपये असे एकूण सर्व ग्राहकांनी एकुण रक्कम सहा लाख ५८ हजार ३६० रुपये एकाच वेळी भरत थकबाकीमुक्त होत महावितरणचे सन्माननीय ग्राहकांचा बहूमान प्राप्त केला आहे. या सर्व ग्राहकांचे महावितरणच्या वतीने पूष्पहाराने कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी अशोक पाटील अमराबादकर यांनी उर्वरीत सर्व ग्राहक लवकरच भरणा करुन गाव थकबाकी मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीच्या यशश्वी आयोजनासाठी उच्चस्तर लिपिक राजकुमार सिंदगीकर यांनी विशेष प्रयत्न केले.

थकबाकी भरुन अख्खे गाव थकबाकीमुक्त करण्याचा संकल्प

महाकृषी ऊर्जा अभियान ही सर्व थकबाकीदार कृषिपंपधारक शेतकऱ्यांसाठी चालून आलेली नामी संधी आहे. आपल्या शेतीला अखेडीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणला सर्व शेकऱ्यांनी आपापली थकबाकी भरुन सहकार्य करण्याची हीच योग्य वेळ आहे. केवळ थकबाकीमुक्तीच नाही तर नवीन वीजजोडणी व सौर कृषी वीजवाहिनीसाठी जमीन उपलब्ध करुन दिल्यास ही एकरी वार्षिक तीस हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत. अमराबाद मध्ये 107 कृषिपंप वीज जोडण्या असून यासर्व वीजजोडण्यांची थकबाकी भरुन अख्खे गाव थकबाकीमुक्त करण्याचा संकल्प आमच्या शेतकरी बंधूंनी केला आहे.
- अशोक पाटील अमराबादकर