
नांदेड : गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वच्छ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी- पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो.
साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला तीन ते चार किलो लोकर लागते. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्याचदा आपल्याला पडत असतील तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी ही एक महत्वाची आहे.
धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-
पाठदुखी, कंबरदु: खी, वात, सांधेदु: खीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.
झोप येत नसणार्यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.
उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.
घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.
अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:
पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी, धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीच्या माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांच्या पेहरावामध्ये घोंगडीचा वापर होता.
घोंगडीच्या वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोलमध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते.
मात्र सध्या जंगलक्षेत्र घटत चालल्याने मेंढी पालन व्यवसायावर गंडातर आले आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी बाळू मामाच्या मेंढ्या वास्तव्यास असतात. राजस्थानी मेंढपाळही आपल्या मेंढ्यांच्या कळपाला सोबत घेऊन या जंगलातून त्या जंगलात जातात. मेंढीची विष्ठा (लेंडी) ही शेतासाठी सेंद्रीय खत म्हणून चांगली असते. त्यामुळे अनेक शेतकरी मेंढ्याचा कळप आपल्या शेतात बसवतात. सरकारने मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्यांना वनविभागाची जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी मेंढपाळातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.