Ashadhi Wari 2025 : भालेराव-दस्तापूरकर घराण्याची वारीसाधना; हनुमंत गुरुजी, अच्युत महाराज यांनी जपलीय परंपरा
Warakari Tradition : मारुती महाराज दस्तापूरकर आणि शंकर महाराज भालेराव यांच्या कीर्तन वारी परंपरेला ८० वर्षांचा अमोल वारसा लाभला आहे. अच्युत महाराज व हनुमंत गुरुजी आजही अखंड सेवा करत आहेत.
लोहा : ब्रह्मीभूत संत मोतीराम महाराज यांच्या निस्सीम प्रेरणा घेऊन ऐंशी वर्षांपासून मारुती महाराज दस्तापूरकर आणि शंकर महाराज भालेराव यांच्या कीर्तन-प्रवचन परंपरेमधून पांडुरंगाची सेवा अखंडित सुरू आहे.