
नांदेड : दरवर्षी ता. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेमध्ये पर्यावरण दिनाची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून हा पर्यावरण दिन दरवर्षी साजरा केला जातो. पर्यावरणासंबंधी जनमानसामध्ये जनजागृती करणे हा मुख्य उद्देश या दिनाचा आहे. यावर्षीच्या पर्यावरण दिनाचे घोषवाक्य आहे. जैवविविधतेचे रक्षण करणे. पर्यावरणाचे संतुलन हे संपन्न अशा जैवविविधतेवर अवलंबून असते. त्यामुळे निसर्ग निर्मित जैवविविधतेचे रक्षण करणे चांंगल्या पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे.
पर्यावरणाशी मैत्री करायला हवी
पृथ्वीवरील प्रत्येक सजीव घटकांना त्यांना मिळालेला जगण्याचा हक्क आपण दिला पाहिजे. आज संजीव जगता मधील अनेक प्रजाती नष्ट होत आहेत, नामशेष होत आहेत. हेच पृथ्वीला ऱ्हासाकडे नेत आहे. भौतिक सुखाकडे सुसाट सुटलेल्या मानव चंद्रावर, मंगळावर जात आहोत. पण आपले अस्तित्व असलेल्या पृथ्वीचा विनाश करत आहे. मानवाने हा विनाश आता थांबायला हवा आणि पुन्हा एकदा या पृथ्वीवरील पर्यावरणाशी मैत्री करायला हवी.
हेही वाचलेच पाहिजे....रामतिर्थच्या ‘या’ प्रकरणात मोक्का लावणार- एसपी मगर
पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील होणे आवश्यक
संपन्न पर्यावरणासाठी वृक्ष हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. वृक्ष पर्यावरणाची फुफ्फुसे आहेत. पण या फुफ्फसावरच घाला घालण्याचे काम मानव करत आहे. जंगलातील झाडाची होणारी कत्तल, वनवे यामुळे त्याचे होणारे वाळवंटीकरण याचा परिणाम वातावरणातील ऑक्सिजन वायू वर होत आहे. आज शुद्ध ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे. काही देशात तर शुद्ध ऑक्सिजनच्या वाटल्या विकल्या जात आहेत. ऑक्सिजनचे वायू विकण्याचे पंप स्थापन होत आहेत. हे भविष्यातील शुद्ध ऑक्सिजनची काय परिस्थिती असणार आहे, याचे ट्रेलर आहे. भविष्यातील अत्यंत वाईट, महाभंयकर परिस्थिती टाळायची असेल तर पर्यावरणाने दाखवलेल्या रेड सिग्नलचा अर्थ समजून घेऊन, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील होणे अत्यंत आवश्यक आहे. मानवाने पर्यावरणाला वृक्ष द्यावेत म्हणजे पर्यावरण आपणास समृद्ध जीवन देईल यात शंका नाही.
हेही वाचा....फळपीक विमाधारकांना भरपाई द्या....कोण म्हणाले ते वाचा
पाच हजार कोटी वृक्षांची लागवड शक्य
जागतिक तापमान वाढीमुळे सर्वजण उष्णतेने घामाघूम होत आहेत. याला आपली जीवनपद्धती कारणीभूत आहे. एका मानवाने दरवर्षी एक वृक्ष लावला तर सरासरी चाळीस वर्ष एका मानवाकडून चाळीस वृक्षांची लागवड होऊ शकते. एकत्रित भारत देशाचा विचार केला तर १३० कोटी लोकांकडून ४० वर्षीचा विचार केला तर पाच हजार कोटी वृक्षांची लागवड लोकसहभागाच्या माध्यमातून करणे सहज शक्य आहे. यामुळे वातावरणात शुद्ध ऑक्सिजन आणि आद्रतेचे प्रमाण यामध्ये क्रांतिकारक बदल होईल. मग कुलर, एअर कंडिशन आणि वातावरण थंड करण्यासाठी आधुनिक साधनांची गरज भासणार नाही.
ऑक्सीजन निर्मिती कारखाने निर्माण करावे लागतील
निसर्ग देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. निसर्गाची पूजा करणे म्हणजे निसर्गाचे जीवनामध्ये असलेले महत्त्व अधोरेखित करणे आहे. मानव हा निसर्गाचेेेच अपत्य आहे. त्यामुळे पालण करत्या सोबत (निसर्गासोबत) मैत्रीपूर्ण संबंध असलेच पाहिजेत. पण मानव आज निसर्गाचा एक नंंबंरचा शत्रू झाला आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढ, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, महाभयंकर वादळे आणि रोगराई वाढवण्यात झाली आहे. मानव पावसापासून, उन्हापासून, थंडीपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या साधनाचा वापर करतो. त्याच प्रमाणे संबंध पृथ्वीची सुरक्षा करण्याचे काम ओझोन नावाचा थर करत असतो. हा संजीवासाठी जीव की प्राण आहे. पण प्रदूषण वाढीमुळे त्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळेच सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सुद्धा सरळ पृथ्वीवर पोहोचत आहेत. त्यामुळे अनेक नवीन रोगांंमुळे मानवाचा मृत्यू होत आहे. ओझोनचा थर म्हणजे O 3 म्हणजे ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र आले की, ओझोन तयार होतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन निर्मिती करणारी कारखाने निर्माण करावे लागतील. हे कारखाने म्हणजे वृक्ष आहेत.
रोग असलेली जागा सोडून दुसरीकडे उपचार
एका वृक्षाची कत्तल करणे म्हणजे अनेक पशु, पक्षी, प्राणी यांचे आश्रयस्थान उध्दवस्त करणे आहे. ऐवढा संबंध त्यांच्यामध्ये आहे. पण समस्या, रोग यावर इलाज करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणे, त्यासाठी पँकेजची घोषणा करणे, आम्हाला जमते. पण ते होऊच नाही म्हणून उपाय करणे जमत नाही. म्हणजेच तकलादु विकास करणे जमते पण शाश्वत विकासाचा पाया मजबूत करणे जमत नाही. हीच खरी विकासाची प्रमुख समस्या आहे. रोग असलेली जागा सोडून दुसरीकडे उपचार करणे आणि त्याने फायदाच होणार नाही पण वेळ, पैशासोबत व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. हीच अवस्था मानवाची पर्यावरणा सोबत झाली आहे. मानवी जीवनात प्लॅस्टिकच्या मोठ्या प्रमाणात वापरामुळे प्रदुषणात अधिक पटीने वाढ झाली आहे.
पर्यावरणासंबंधी कायद्याची अंमलबजावणी आवश्यक
आज राज्यात प्लास्टिक बंदी असली तरी अंमलबजावणी आणि वास्तव यात खूप मोठा फरक आहे. आज देशात पर्यावरणासंबंधी अनेक कायद्याची जंगल तयार करण्यात आले आहे. पण त्यांची जनजागृती आणि अंमलबजावणीचा अभाव आहे. यामुळे कायदे कागदावरच राहत आहेत. कायद्यानुसार ना कारवाई केली जाते ना कुणाला शिक्षा होते. त्यामुळे नवनवीन कायदे करण्यापेक्षा आहेत या कायद्याची अंमल बजावणी करणे पर्यावरण रक्षणासाठी क्रांतिकारक पाऊल ठरणार आहेत. यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी इच्छा शक्ती दाखवणे आवश्यक आहे.
निसर्गाचे देणे लागतो याचे भान आवश्यक
विकास, प्रगतीला विरोध कधीच नाही. निसर्ग श्रेष्ठ की माणूस हा वादाचा विषयच नाही. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संतांच्या उक्ती प्रमाणे एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण व्यवहारातूनच शाश्वत विकासाचा मार्ग तयार करता येणार आहे. हे मात्र खरे आहे. आजचं वर्तमान मानवाकडून पर्यावरणावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत कित्येक पटीने वाढ होत आहे. त्यामुळे दिवसागणिक पर्यावरणाचा ऱ्हास वाढत आहे. माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निसर्गाकडुन खुप काही घेत असतो. याची जाण ठेवून आपणही या निसर्गाचे काही देणे लागतो याचे भान राखणे आवश्यक आहे.
इको फ्रेंडली आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता
विकासाचा विचार करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे तथा इको फ्रेंडली आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती करणे आवश्यक आहे. ही आजची गरज, उद्याची आणि भविष्याची मागणी आहे. सरकार, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि जनता या सर्वांनी प्रामाणिकपणे पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून पर्यावरणाची सेवा करणे हीच खरी देशसेवा आहे. कुछ हरे भरे काम अपने धरती के नाम करायला हवे, स्वच्छ, सुंदर, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, जैवविविधता संपन्न भारतासाठी आज संकल्प करुया आणि तो सिद्धीस नेऊ या. राष्ट्रसेवेचे हे एक महान कार्य आपण कराल हीच निसर्गाला पर्यावरण दिनाची अनमोल भेट असेल.
मानवामुळेच निसर्गावर फार मोठी आपत्ती
आज मानवाकडून जो निसर्गाशी व्यवहार सुरू आहे. त्याची फळे निसर्ग मानवाला देत आहे. म्हणून नैसर्गिक आपत्ती म्हणून निसर्गालाच दोष द्यायचा हे आता थांबले पाहिजे. कारण आज मानवामुळेच निसर्गावर सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे निसर्गाने मानवावर आपत्ती आणली नाही तर मानवामुळेच निसर्गावर फार मोठी आपत्ती आली आहे. निसर्गाला कारण जरी कळत नसले तरी परिणाम मात्र नक्की कळतात. हे मात्र यातून सिद्ध होते.
- डॉ. नागेश कराळे
मोबाइल क्र. ९६३७४१३९१३.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.