esakal | लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि नांदेड अन्नपूर्णातर्फे गरजुंना पुरविले जाताहेत जेवणाचे डबे

बोलून बातमी शोधा

Lions Club Nanded Central

लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि नांदेड अन्नपूर्णातर्फे गरजुंना पुरविले जाताहेत जेवणाचे डबे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबऴे

नांदेड : येथील लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि नांदेड अन्नपूर्णा तर्फे शंभर टक्के लोकसहभागातून सहा दिवसांपासून दररोज 300 जेवणाचे डबे गरजुंना पुरविण्यात येत आहे. लॉयन्सचा डबा या उपक्रमाला अनेक दानशूर नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे. नवीन नोंदणी करणाऱ्यामध्ये ॲड. बी. एच. निरणे परिवारातर्फे तसेच स्वाती राहुल सोनवणे यांच्या

वाढदिवसानिमित्त प्रत्येकी 300 डबे तर निशिकांत उत्तमराव देशमुख परभणी यांनी 200 डबे दिले आहेत. सुरज बंकटलालजी राठी यांनी 150 डब्यासाठी तर देविदास रामजी राजेवाड स्नमित्रनगर यांनी 70 डब्यासाठी योगदान दिले आहे. प्रत्येकी 100 डबे देणाऱ्या नवीन अन्नदात्यांमध्ये डॉ. राजेंद्र मुंदडा, दिलीप उत्तरवार भोकर, संजय दि. पवार, प्रवीण लड्डा, एस.आर. पाटील, मारुती कदम सोनखेड, कै.गंगाबाई नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ पवन जाधव, मोहित जयप्रकाश सोनी, कै.निर्मला गोकुळादास मामोडे संभाजीनगर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, शिल्पकार गुरूवर्य सोपानकाका शूर माळाकोळीकर यांच्या स्मरणार्थ, प्रकाश किशनराव पवार यांचा समावेश आहे.

हेही वाचा: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर

याशिवाय माधवराव फुलारी कंधार, कै.रतन पेंटर जैन यांच्या स्मरणार्थ, कै. दुर्गाप्रसाद गणेशलाल सारडा मालेगाव यांच्या सन्मानार्थ संजय दिनेश सारडा आणि कै.गणेशसिंह घुडूसिंह ठाकुर यांच्या स्मरणार्थ अर्जुनसिंग ठाकूर, कै.नलिनी दत्तात्रय जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रूपाली बालाजी कवानकर यांच्यातर्फे गोड जेवण, नारायण देवराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किशन नारायण देवराज तसेच दुगमवार व्यंकटरामन तलाठी देगलूर, धनंजय साले, राजेश गवळी, मदन व्यंकटराव बैस कोलंबी, संध्या राजेंद्र शिंदे पारसनगर, मल्हार माटे यांच्या वाढदिवसानिमित्त बालाप्रसाद लक्ष्मणराव माटे, शिवऐक्य पार्वतीबाई मनोहर स्वामी, रा.आखाडा बाळापूर यांचे स्मरणार्थ तर्फे विश्वनाथ मनोहर स्वामी, वामनराव हुगेवार आनंदनगर, कै.विठ्ठल (बाबुराव) गो. कवटेकवार यांच्या स्मरणार्थ व्यंकटेश कवटेकवार, शिवाजीनगर यांच्यातर्फे गोड जेवण, कै. बळीराम बाळकृष्ण रेखावार व कै. शारदा बळीराम रेखावार यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी 50 डब्बे दिले आहेत.