प्लाझ्मा दानसाठी कोरोना यौद्ध्यांची यादी जाहिर करावी- डॉ. गंगाधर घुटे

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 16 September 2020

कोरोनावर यशस्वी पणे मात केलेल्या कोरोना यौध्यांची यादी जाहीर करण्यात यावी, जेणेकरून कोरोना रुग्णांना प्लाझ्मा मिळू शकेल.

नांदेड : कोरोना या आजारावर आपल्या महाराष्ट्र राज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात येत असुन, मागील काही दिवसांच्या अनुभवावरून ही उपचार पद्धती कोरोना आजारावर अत्यंत प्रभावी असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. 

कोरोना झालेल्या रुग्णाला जास्त सिरीयस होण्या अगोदर साधारणतः मध्यम स्वरूपाचा आजार असतांनाच म्हणजे व्हेंटिलेटरवर जाण्या अगोदर जेंव्हा ऑक्सिजनवर असतो त्याच वेळी प्लाझ्मा थेरपी सुरू केल्यास अशा रुग्णांना कोरोनावर मात करणे शक्य होते. कारण कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीच्या प्लाझ्मामध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी तयार झालेल्या अँटिबॉडीझ असतात व अशा व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तगट मॅच होत असल्यास) कोरोनामुळे आजारी असलेल्या रुग्णाला दिल्यास रुग्णाला तयार अँटिबॉडीझ मिळाल्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य होते.

हेही वाचा  नैसर्गिक वीज पडून शेतकरी ठार तर दोघे गंभीर -

प्लाझ्मा दान करणे हे रक्तदान करण्यासारखेच सुरक्षित 

कोरोना रुग्णाला वेळेवर प्लाझ्मा मिळाल्यास अशा रुग्णांचे फुफ्फुस, ह्रदय, किडनी, लिव्हर इत्यादी अवयव  निकामी (मल्टि ऑर्गन फेल्युअर) होऊन मृत्यू होण्याचा धोका टाळण्यास मदत होते. त्यामुळेच कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा हा कोरोना रुग्णासाठी नवसंजीवनीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्लाझ्मा दान करणे हे रक्तदान करण्यासारखेच सुरक्षित असून त्याचा दात्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दात्यानी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. परंतु दुर्देवाने असा प्लाझ्मा मिळविण्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना अनंत अडचणी येत आहेत. कारण शासनाच्या धोरणानुसार कोरोना रुग्णांचे व ठणठणीत बऱ्या झालेल्या व्यक्तीची नावं गुप्त ठेवण्यात येतात.

येथे क्लिक कराखावटी योजना काय आहे व कोणासाठी? वाचा सविस्तर -

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित करू 

ज्यांचा कोरोना पूर्णपणे बरा झालेला आहे त्यांचे नाव गुप्त ठेवण्याचे काहीही कारण नसून अशा व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक शासनाने संकेतस्थळावर जाहीर करावीत. जेनेकरून ज्यांना प्लाझ्मा हवा आहे अशा कोरोनाग्रस्त व्यक्तींचे नातेवाईक, या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते प्लाझ्मा दानासाठी या प्लाझ्मा दात्यांना विनंती करू शकतील. प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतील.
त्यामुळेच एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता केंद्र शासन व राज्य शासनाने कोरोनावर मात केलेल्या कोरोना यौध्यांची नावे आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावीत असे आवाहन रक्तदान, प्लाझ्मा दान क्षेत्रात कार्यरत असलेले सामजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर घुटे यांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: List of corona warriors for plasma donation should be announced Dr. Gangadhar knees nanded news