शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पशु व दुग्ध व्यवसायाला चालना महत्वाची- अशोक चव्हाण

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्याच्या विविध विकास कामामध्ये ग्रामीण भागात शेतीला पुरक उद्योगाची जोड देण्यात व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दुग्धव्यवसाय हा अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडू शकेल. या व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला पुरेशा साधन सामुग्रीसह एक पशु चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असे, प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना त्यांच्या आजारी पडलेल्या पशुधनाला त्यांच्या गावातच उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या तीन पशु चिकित्सा व उपचार वाहनाचे लोकार्पण आज जिल्हा परिषदेच्या प्रागंणात त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कोविड अंतर्गंत असलेल्या नियमाचे पालन करुन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहीनी येवनकर, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पदमा सतपलवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शदर कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव नागेलीकर, सुरेशराव अंबुलगेकर याच्यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्याची संख्या व क्षेत्रफळ अधिक आहे. कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात आपण जिल्ह्याच्या विकासासाठी 355 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात आदिवासी विकास विभागामार्फत वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यातून साकारणाऱ्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचल्यास खऱ्या गरजूपर्यंत पोहचता येईल असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन माहिती, शिक्षण व प्रसार यावर जिल्हा परिषदेने भर द्यावा असे सूचित केले. नांदेड जिल्हा परिषद ही वैविध्यपूर्ण योजना अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाओ, पशु संवर्धन विभाग, माझे गाव सुंदर गाव,  प्रत्येक गावाला स्मशान, दहन-दफन भूमी यांची माहिती देणारे स्टॉल्स जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आले होते. या स्टॉल्सलाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शासकीय योजनाच्या माहितीचा प्रसार अशा पध्दतीने तालुका पातळीवर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी जिल्हा परिषदेला सूचना केल्या. 

यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना दहा हजार रुपयांचे सानुगृह अनुदानाचे धनादेश संबंधिताच्या कुटूंबियाकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. याच बरोबर पशुसंवर्धन विभागाची माहिती पुस्तिका, बाल विवाह प्रतिबंध अधिनियम अंतर्गत शपथ, माझे गाव सुंदर गाव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील स्मशानभूमी, दहन, दफन भूमी नसलेल्या गावांना गायरान जमिनीच्या सनदचे वाटप करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com