esakal | लाॅकडाउन : खते व किटकनाशक खरेदीसाठी या बँकेचा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पोस्ट बँकेचे पोस्टमन हे जिल्ह्यातील गावा-गावात, वाड्या- तांड्यातील घरोघरी व शेताच्या बांधावर जाऊन इतर बँक खात्यातील पैसे मागणी केल्याप्रमाणे आधार कार्ड नंबरवर काढून देत आहेत

लाॅकडाउन : खते व किटकनाशक खरेदीसाठी या बँकेचा आधार

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात लॉकडाउन व संचारबंदी असल्यामुळे सर्वच बँकेचे व्यवहार बंद आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते व कीटकनाशक संचारबंदीमध्ये खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ईतर बँक खात्यातून रोख रक्कम देण्याची सोय टपाल बँक करत आहे. पोस्ट बँकेचे पोस्टमन हे जिल्ह्यातील गावा-गावात, वाड्या- तांड्यातील घरोघरी व शेताच्या बांधावर जाऊन इतर बँक खात्यातील पैसे मागणी केल्याप्रमाणे आधार कार्ड नंबरवर काढून देत आहेत. शेतकऱ्यांनी व गावातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे नांदेडचे डाक विभागाचे विपणन कार्यकारी अधिकारी सुरेश सिंगेवार यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी पोस्ट बँकेचे खाते उघडून घ्यावे यासाठी आधारकार्ड नंबर व मोबाईल क्रमांक दिल्यास एका मिनिटात खाते उघडू शकता.
पोस्ट बँकेचे खाते उघडल्यास शेतकऱ्यांना व नागरिकांना मोबाईलमध्ये पोस्ट बँकेचे अँपद्वारे पोस्ट बँकेच्या खात्यावरून पैसे जमा करणे पाठवणे व उचलणे हे सर्व शेतात व घरी बसून बँकेचे व्यवहार करता येतील असे ही विपणन डाक अधिकारी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ता. २७ रोजी गावात व वाडी- तांड्यात पोस्टमनमार्फत पोस्ट बॅंक खाते उघडण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या गावातील पोस्टमन याच्याकडे येऊन खाते उघडून घ्यावे.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती पाणी साठा...? वाचा सविस्तर

जिल्हाधिकारी यांनी दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पालन करुन खाते उघडण्यात येणार 

पोस्ट बँकेच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्याचे अनुदान, जनधन अनुदान, गैस सबसिडी, रोजगार हमी योजना अनुदान, निराधार, अपंग, अनुदान जमा होत आहे. यासाठी नागरिकांना या मोहिमेचा मोठा लाभ घरपोच मिळणार असल्याचेही श्री. सिंगेवार यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील खाते उघडण्याची विशेष मोहीम ही जिल्हाधिकारी यांनी दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पालन करुन खाते उघडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाला न घाबरता मास्क किंवा रुमाल बांधावे, गर्दी करु नये, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अशी जनजागृती करण्यात येत आहे. 

loading image
go to top