Electric Shock: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा शेतात वीज धक्क्याने मृत्यू
Nanded News: लोहा (जि. नांदेड) येथे शेतात विजेच्या धक्क्याने अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अक्षय गोविंद उंडाडे या २८ वर्षीय तरुणाच्या निधनाने लोहा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
लोहा (जि. नांदेड) : शेतात विजेच्या धक्क्याने अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १५) दुपारी येथे घडली. अक्षय गोविंद उंडाडे (वय २८) असे त्याचे नाव आहे.