महाविद्यालयातील कॅम्पसचे लूक बदलणार, कशासाठी? ते वाचा

nanded news
nanded news

नांदेड : जिल्ह्यातील अनेक महाविद्यालय कॅम्पसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारात आहे. त्यामुळे विद्यार्थीच नव्हेतर प्राध्यापक व बाहेरुन येणाऱ्या व्हिजीटरसाठीदेखील स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यासाठी प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय, आयटीएम महाविद्यालय, एमजीएम कॅम्पस, यशवंत महाविद्यालय यांच्यासह अनेक महाविद्यालय प्रशासनाने आत्तापासून यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

इतकेच नव्हे तर काही महाविद्यालयांनी वर्ग खोल्यापासून ते बसण्याचे डेस्कमध्येदेखील बदल करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी महाविद्यालय प्रशासनास मोठा खर्च करावा लागणार असला तरी, या पुढील काळात ज्या महाविद्यालय समांतर अतंर, सॅनेटायझर, हात धूण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, वर्गखोल्यात बैठक व्यवस्था ही योग्य असेल तरच पुढील प्रवेश घेण्यासाठी पालक भर देणार आहेत. ही बाब सर्व महाविद्यालय प्रशासन जाणून आहे. त्यामुळे कॅम्पसमधे प्रवेश करण्यापासून ते बैठक व्यवस्था आणि हात धुण्यासाठी बेसिन, सॉनिटायझरच्या व्यवस्थेवर खर्च करण्यासाठी मागे पुढे बघणार नाहीत.

हेही वाचा - Video - लॉकडाउनमध्येही का वाढतोय सोन्या - चांदीचा भाव ?

एसजीजीएस महाविद्यालय फवारणी यंत्र खरेदी करणार
एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयाने तर यासाठी सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारणीसाठी पिचकारी (यंत्र) खरेदी करण्याची तयारी केली आहे. शिवाय महाविद्यालयातील ७० टक्के विद्यार्थ्यांकडे यापूर्वीच वायफाय सुविधी दिली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्यांच्याकडे ॲक्सेस नसेल त्या विद्यार्थ्यांनीच वर्गात दोन ते तीन फुटाचे समांतर अंतर राखुन शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे, यासाठी महाविद्यालय प्रशासन आग्रह धरणार आहे.

हेही वाचा - कोरोना देणार का देगलूरकरांना धक्का?, नऊ अहवालांकडे लक्ष -

नियमांचे पालन करण्यावर अधिक भर
शिवाय कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी हात धुण्यासाठी बेसीन, वर्गखोल्यांची विभागणी, वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था, खानावळीत जेवताना वेगळी नियमावली यावर काम सुरु केले आहे.

काळजी घेणे हीच प्राथमिकता
कोरोनाचा प्रादूर्भाव लवकर संपणार नाही, त्यामुळे कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यासह अभ्यागतांसाठी वेगळी सुविधा देण्यासाठी तयारी सुरु असून, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. विद्यार्थी, प्राध्यापक आणि येणाऱ्या अभ्यागतांची काळजी घेणे ही महाविद्यालयाची प्राथमिकता असणार आहे. - डॉ. यशवंत जोशी, डायरेक्टर, एसजीजीएस महाविद्यालय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com