Mahur Datta Shikhar Mahant Death: श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी; अध्यात्म, सेवा आणि महंत परंपरेचा तेजस्वी दीप विझला

Shri Datt Shikhar Peeth Mahant Madhusudan Bharti Maharaj dies devotees mourn; श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराजांच्या निधनाने अध्यात्म, सेवा व महंत परंपरेचा तेजस्वी दीप विझला; माहूरसह परिसरात शोककळा, भाविकांचा अंतिम दर्शनासाठी मोठा जमाव
End of a Spiritual Era: Mahant Madhusudanji Bharti Maharaj of Shri Datta Shikhar Sansthan Passes Away

End of a Spiritual Era: Mahant Madhusudanji Bharti Maharaj of Shri Datta Shikhar Sansthan Passes Away

Sakal

Updated on

माहूर (जिल्हा नांदेड) : श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज (९५ )हे शनिवार,ता.४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास इहलोक सोडून वैकुंठवासी झालेत.त्यांच्या इहलोकी जाण्याने असंख्य भक्तगन शोकसागरात बुडाले आहेत.

स्वर्गीय महंत प.पू.अच्युत भारती महाराज हे वैकुंठवासी झाले नंतर प.पू.मधुसूदनजी भारती महाराज हे सन १९७८ साली संस्थानच्या धार्मिक प्रक्रियेनुसार गादीवर विराजमान झाले होते.अत्यंत साधेपणा,अध्यात्मिक चिंतन आणि भक्तीभावासाठी ओळखले जात होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात श्री दत्त शिखर संस्थानच्या धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच भक्तांच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक उपक्रम,पूजा-अर्चा,तसेच उत्सव मोठ्या श्रद्धा आणि शिस्तीत पार पडत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com