नांदेड : सामाजिक समतेचा वारसा जपण्यातच सर्वांचे हित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले

नांदेड : सामाजिक समतेचा वारसा जपण्यातच सर्वांचे हित

नांदेड - महाराष्ट्राला ऐतिहासिक, भौगोलिक, वैचारिक, सामाजिक सुधारणेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. गत दोन हजार वर्षांच्या काळात या भूमीने आपल्या कष्टाच्या बळावर विविध क्षेत्रात ठसा उमटविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन रयतेला जाणता राजाची प्रचिती दिली. महाराष्ट्राला एका बाजुला शौर्याचा स्फुर्तीदायी वारसा तर दुसऱ्या बाजुला संत, महात्म्यांच्या समतेचा, प्रबोधनाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा समतेचा वारसा जपण्यातच महाराष्ट्राचे हित आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजवंदनप्रसंगी ते रविवारी (ता.एक मे) बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले की, नांदेड जिल्हा परिषद आता ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ६० वर्षाच्या कालावधीत विकास कामांची अनेक टप्पे आपण पार केले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेचा हिरक महोत्सव, नांदेड-वाघाळा महापालिकेचे रौप्य महोत्सवी वर्षे तसेच येत्या ता. १७ सप्टेंबरपासून सुरू होणारे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष हा चांगला योगा-योग जुळून आला असल्याचेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

यांचा झाला सन्मान

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आदर्श तलाठी पुरस्कार विजय जयराम रणविर, पोलिस दलात उकृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग दिगांबर भारती, गंगाराम हनमंतराव जाधव, शेख चांद शे. अलीसाब, मोटार परिवहन विभागाचे शिवहार शेषेराव किडे, राजेंद्र राजलिंग सिटीकर, दिपक रघुनाथराव ओढणे, दिनेश रामेश्वर पांडे, समिरखान मुनिरखान पठान, दीपक राजाराम पवार, दीपक दादाराव डिकळे, दत्ता रामचंद्र सोनुले, सहायक पोलिस उपनिरिक्षक संभाजी संग्राम गुट्टे यांना देण्यात आले. वृक्षारोपण व पर्यावरण विषयावर उत्तम कामगिरी करणारे परमेश्वर पौळ, नांदेड जिल्हा पोलिस दलाला सीएसआर २० दुचाकी वाहने दिल्याबद्दल कमल किशोर कोठारी यांचाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.

Web Title: Maharashtra Anniversary Guardian Minister Ashok Chavan Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top