EKYC : ई-केवायसीसाठी ३० एप्रिलची मुदतवाढ; माहूर तालुक्यात अजूनही १६ हजार ६४४ शिधापत्रिकाधारक वंचित
RationCard EKYC : राज्य सरकारने शिधापत्रिकेवरील आधार क्रमांक जोडण्यासाठीची ई-केवायसी प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. माहूर तालुक्यात १६,६४४ शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी अजून बाकी आहे.
माहूर : शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची मुदत आता वाढवून ३० एप्रिल करण्यात आली आहे.