Earthquake in Nanded: पहाटे सुमारास नांदेड, परभणी अन् हिंगोली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं! घरांची पडझड, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

Earthquake in Nanded: हिंगोलीसह जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ६ वाजता ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. तर दांडेगावात काही घरांची पडझड देखील झाली असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
Earthquake in Nanded
Earthquake in NandedEsakal

हिंगोली, ता. २१ हिंगोली जिल्ह्यातअनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. ४.५ रिश्टर स्केल नोंद झाली आहे.

हिंगोली जिल्हयातील सर्वच गावांमधून गुरुवारी ता. 21 पहाटे 6 वाजून 8 मिनिटांनी भूकंपचा मोठा धक्का बसला आहे. 4.5 रिश्टर स्केलची नोंद झाली तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्कयाची 3.6 एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचनाही गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात

दरम्यान, गुरुवारी सकाळी सहा वाजून ९ मिनिटांनी जमीन चांगलीच हादरली. भूकंपाचा मोठा आवाजही झाला. विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्हयातील सर्वच ७०० पेक्षा अधिक गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यात त्याची तिव्रता अधिक होती तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांत कमी अधिक तिव्रता जाणवली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत. दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे.

Earthquake in Nanded
Lok Sabha Election 2024 : जागावाटपाचा तिढा सुटला? संभाव्य उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर? कोणाला मिळणार संधी

हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमीनीतून आवाज येऊन जमीन हादरत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांच्याही अंगवळणी पडल्या आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

दरम्यान, आखाडा बाळापूर व परिसरात सकाळी ६ वाजून ९ मिनिटाचा मोठा धक्का तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्का जाणवल्याचे अरूण पतंगे यांनी सांगितले. तर पिंपळदरी परिसरातील आता पर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याचे बापुराव घोगडे यांनी सांगितले.

Earthquake in Nanded
सोलापूर शहरातील १४ महिन्यांतील स्थिती! दररोज एका वाहनाची चोरी; २ दिवसांतून १ घरफोडी अन्‌ महिन्यात सरासरी ३ जबरी चोऱ्यांचीही नोंद

जिल्हयात झालेल्या या भूकंपाची ४.५ रिश्टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली १० किलोमिटर पर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरा धक्का ६ वाजून १० मिनिटांनी बसला असून त्याची ३.६ रिश्टर स्केल नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वच गावांमधून नुकसानीची माहिती घेण्याच्या सुचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र

मंगळवारी सकाळी ६ वाजुन ९ मिनिटाला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे  सकाळी ६.१९ वाजता ३.६ रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com