Agriculture Scheme : फळपीक विम्यासाठीही आता शेतकरी ओळखपत्र
Insurance Guidelines : २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘अॅग्रिस्टॅक’अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक आहे.
नांदेड : प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहारामध्ये अधिसूचित फळपिकांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे