
दवीधर निवडणुकीत या महाआघाडीला बाजुला ठेवुन पदवीधरानी भाजपाचे उमेदवार बोराळकर यांना एक नंबरची पसंदीचे मतदान करावे असे आवाहन माजी मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ता.२८ रोजी विष्णुपुरी येथील सहयोग सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित पदवीधर मतदारांना संवाद साधताना व्यक्त केला.
नांदेड- राज्यातील महाविकास आघाडीला सत्तेत येवुन वर्षषपुर्ती होत आहे . परंतु आज पर्यत या सरकारने शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, युवक, शिक्षक, पदवीधर याच्या प्रश्नासह मराठा, धनगर समाजाचे आरक्षषणाला तिलाजंली देत वर्षपुर्ती केली . केवळ सत्तेचा माज चढल्यासारखे "बघुन घेवुत" अशी भाषा वापर करत आहेत . ह्या सरकारने जनतेच्या कल्यानासाठी एक ही कार्यक्रम राबवला नाही. या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत या महाआघाडीला बाजुला ठेवुन पदवीधरानी भाजपाचे उमेदवार बोराळकर यांना एक नंबरची पसंदीचे मतदान करावे असे आवाहन माजी मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ता.२८ रोजी विष्णुपुरी येथील सहयोग सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित पदवीधर मतदारांना संवाद साधताना व्यक्त केला.
या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंञी तथा भाजपाचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड , सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव तथा माजी महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, महानगर अध्यक्ष प्रविण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलिप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख , युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, श्रावण पाटील भिलवंडे, देविदास राठोड, दिलीपसिंह ठाकूर, विजय गंभीरे, व्यंकटराव मोकले, राजेंद्रसिंग पुजारी, अनिलसिंह हजारी, अशूतोष धर्माधिकारी, मनोज जाधव, संभाजी देशमुख, संदीप पावडे, केशव वानखेडे, अंकेश हंबर्डे, भरत पाटील, गणेश जाधव, संतोष पा. जानापुरीकर यांचासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - BREAKING : नक्षलवाद्यांचा हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव शहीद
पुढे बोलताना आ. विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला वर्षपुर्ती झाल्याबद्दल मुलाखत दिली .या मुलाखतील त्यानी भविष्यातील कामाचे "व्हिजन" जनतेला न देता केवळ "बघुन घेण्याची" भाषा केली. करोणा महामारीमुळे लाखो कामगाराच्या हातचा रोजगार गेल्याने ते सर्व बेकार झाले. अनेक उद्योग बंद पडले, अनेकांचे कुंटुंब उघड्यावर आले, तर अतिवृष्टीमुळे शेतकर्याच्या तोंडाला आलेला घास पाण्यात वाहुन गेला तरी या सरकारने केवळ बघ्याची भुमिका बजावली आहे. शेतकर्याचा अपेक्षा भंग केल्या, बेरोजगाराच्या हाताला काम नाही. शाळा, महाविद्यालय बंद करुन युवकांचे भविष्य आंधारात लोटले आहे .
प्रसार माध्यमावर गदा आणुन व्यक्ती स्वातंञ्याचा गळा दाबण्याचे काम हे महाविकास आघाडी करत आहे. तिन पक्षाचे सरकार नव्हे तर हे बिघाडी सरकार आहे. या सरकारने अनुदानीत शाळेचा प्रश्न असो, शिक्षकांचे प्रश्न, किवा पदवीधराचे प्रश्ना असो एक हि प्रश्न या सरकारने सोडवले नाहीत . यासह जनतेसाठी एक हि कल्याणकारी योजना या सरकारने राबवली नाही. यामुळे जनतेत या सरकारने विश्वासघात केल्याची भावना आहे. बिहार राज्यातील मतदानात भाजपाला सर्वात जास्त मतदान महिलांनी केले. का तर केंद्रातील मोदी सरकारने कोविड काळात राज्यातील सर्व जनतेला धान्य पुरवठा करण्याचे काम केेले होते. कारण महिलांनाच माहीती असते कुंटुंबाचे पोट कसे भरायचे त्यामुळे तेथील महिलानी भाजपाला मतदान केले.
मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचे काय झाले? आज मराठा समाजातील मुलाना शाळेत व महाविद्यालयात प्रवेश हा सर्वसाधारण गटातुन प्रवेश मिळत आहे .त्यामुळे मराठा समाजातील मुलाचे भविष्य आधातरी झाले आहे . या सर्व प्रश्नासाठी भाजपा हाच पर्याय आहे. त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणार्या सरकारला घालवण्यासाठी पदवीधर मतदारानी भाजपाचे उमेदवार शिरिष बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मतदान करावे . असे आवाहान करुन मतदान करताना योग्य अंकाचा वापर करावे अन्यथा मागील निवडणुकीत ८ हजार मतदान बाद झाले होते यांची दक्षता पदवीधरानी घ्यावी असे ते म्हणाले .या वेळी खा चिखलीकर, यांनी उपस्थित पदवीधर मतदाराशी संवाद साधुन भाजपाचे उमेदवार यांना पहिल्या पसंदीचे मतदान करण्याचे आवाहन केले.