Mahur Yatra: माहूरगड भाविकांनी गजबजला; नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेला सुरवात
Narali Pournima 2025: नारळी पौर्णिमेनिमित्त माहूरगडावरील श्री दत्तात्रेय संस्थान येथून पारंपरिक परिक्रमा यात्रेला भक्तिमय सुरुवात झाली. पंचक्रोशी मार्गावरील विविध तीर्थस्थळांना भेटीचा योग.
माहूर (जि. नांदेड) : माहूरगडावरील श्री दत्तात्रेय संस्थानमध्ये नारळी पौर्णिमेच्या परिक्रमा यात्रेला रविवार (ता. तीन) पासून सुरवात झाली. यानिमित्त महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात अखंड दत्तनाम सप्ताह सकाळी सहापासून सुरू झाला.