माहूर नगरपंचायत बनले भ्रष्टाचाराचे कुरण; नगरसेविका पतीविरुद्ध लेटरबॉम्ब

file photo
file photo
Updated on

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर शहरातील दलित वस्तीतीत रखडलेले नाली बांधकाम, सौर ऊर्जा लाईट संदर्भात नोंदविलेला आक्षेप व नव्वद लाख रुपये निधीचे विविध स्वरुपाच्या विकास कामाची माहिती सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका ज्योती कदम यांनी मागितली असता त्यांच्या पतीविरुद्ध नगरपंचायत कार्यालयाच्या काम काजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार नगर पंचायत माहूरच्या कार्यालयीन अधीक्षक, नगर अभियंत्यांसह कर्मचारी यांनी केल्याने माहूरचे राजकारणात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माहूर नगरपंचायत मध्ये वैशिष्टपूर्ण योजनेखाली कोट्यावधी रुपयाचा निधी आलेला आहे. त्या निधीमधून बेसुमार बोगस विकास कामे केली जात आहेत. टक्केवारीची खैरात वाटून मंत्रालयीन स्तरावरुन विकास कामासाठी निधी आणणाऱ्या तथाकथित नेत्यांच्या हाताची बाहुली बनलेल्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना नागरिक, लोकप्रतिनिधी व नगरपंचायत मॅन्युअलचा विसर पडल्याची अनेक उदाहरणे दररोज समोर येत आहेत.या नगरपंचायतमध्ये नागरिकांच्या सूचना तक्रारी व मागण्यांना कुठलेही स्थान नाही. ही बाब या प्रकरणावरुन स्पष्ट होते. नगरपंचायतच्या माध्यमातून दलित वस्ती विकास योजने अंतर्गत जवळपास नव्वद लक्ष रुपयाचे नाली बांधकाम हाती घेण्यात आलेले होते. 

सुरुवातीला नाली बांधकामाचे उद्घाटन करुन खोदकाम करण्यात आले परंतु काही दिवसात केले. खोदकाम बुजवण्यात आले आणि या कामावरील निधी इतरत्र वळता करण्यात आला. तो निधी कोणत्या कामावर खर्च करण्यात आल्याची अधिकारीक माहिती सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका ज्योती विनोद कदम यांनी मासिक बैठकीत व निवेदनाद्वारे मागणी केली. ज्योती कदम यांनी मागितलेली माहिती त्यांना देण्यात तर आलीच नाही. याउलट नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडेल या भीतीमुळे नगरपंचायतच्या अधिकारी- कर्मचारी मंडळीने बालिशपणाची पातळी गाठून (ता. २६) रोजी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योती कदम यांचे पती सहाय्यक कृषी अधिकारी विनोद कदम यांच्याविरुद्ध नगरपंचायत कामामध्ये हस्तक्षेप करून एट्रोसिटी दाखल करण्याची धमकी देत असल्याची तथ्यहीन तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे केली.

नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी महिला लोकप्रतिनिधी विरुद्ध टाकलेल्या लेटर बॉम्बने एका दलित महिला लोकप्रतिनिधी ची कुचंबणा नगरपंचायत प्रशासन कशा पद्धतीने करत आहे.याची आपबिती नगरसेविका ज्योती कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली.या घटनेवरून माहूर नगरपंचायत ची कार्यपद्धती कोणत्या वाटेने जात आहे.हे सिद्ध होते.एकाधिकारशाही ने बरबटलेले माहूर नगरपंचायत सध्यास्थितीत भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.तत्पूर्वी वैशिष्ट्यपूर्ण विकास निधीत प्रचंड निकृष्ट दर्जाचे कामे करून केवळ निधी लाटण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात येत असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या नगरसेविका वनिता भगवानराव जोगदंड पाटील यांनी केली होती.त्या वेळेसही त्यांची मुस्कटदाबी करण्यास नगरपंचायत प्रशासन कमी पडले नव्हते.आणि आता तीच परिस्थिती राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविका ज्योती कदम यांच्या वर येऊन ठेपली आहे.


माहूर नगरपंचायत विकास कामासाठी दहा कोटीच्या निधीच्या काढण्यात आलेल्या निवेदनाचे अंदाजपत्रक, नव्वद लक्ष रुपयाचे दलित वस्तीमधील नाली बांधकामावर अक्षेप नोंदवून माहिती मागितल्याने व साई लेआउटमधील नगरपंचायतला हस्तांतरित केलेल्या राखीव जागेवरील पंधरा प्लॉट टाकून त्याची विक्री करण्याचा घातलेला घाट उघडकीस आणल्याने नगर पंचायत प्रशासन व भ्रष्टाचार प्रकरणात लिप्त असलेले नगरपंचायत चे अधिकारी, कर्मचारी मी दलित मागासवर्गीय महिला नगरसेविका असल्याने माझा मानसिक छळ करण्यासाठी माझ्या पतीविरुध्द धादांत खोटी तक्रार करुन कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार प्रकरणावर पडदा टाकण्याच्या तयारीत आहे. ओपन स्पेसमधील प्लॉट सहित सर्व प्रकरणाची कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध असून वरिष्ठ स्तरावर दाद मागणार आहे.
- ज्योती विनोद कदम, नगरसेविका, नगरपंचायत माहूर.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com