माहूरच्या पोलिस उपनिरीक्षकाने एका नेत्याच्या सांगण्यावरुन केली कामगारास मारहाण

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणीबाणी सदृश्यस्थिती असल्याचा फायदा घेत काही पोलिस अततायीपणा करत नागरिकांवर दबाव टाकत अन्याय करीत असल्याच्या अनेक घटना अधूनमधून समाजमाध्यमात व्हायरल होत असल्याने पोलिस प्रशासनाबाबत नागरीकात नाराजीचा सूर उमटत असतांनाच माहूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात वाचक उपनिरीक्षक पदावर असलेल्या शरद घोडके यांनी कामावर जात असलेल्या कामगारास कॉलर पकडून खाजगी वाहनात कोंबून पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सुंदरीपट्ट्याने मारहाण केल्याची घटना (ता. सहा ) एप्रिल रोजी सकाळी माहूर येथे घडली असल्याने पोलिस प्रशासनाच्या अततायीपणाबद्दल जनतेत नाराजीचा सुर दिसून येत आहे. पंधरा दिवसात अन्याय करणाऱ्या पोलिस निरीक्षकास निलंबित करुन न्याय द्या अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा कृष्णा जाधव रा. दत्तमांजरी या अन्यायग्रस्त कामगाराने पोलिस ठाणे माहूर यांना दिलेल्या तक्रारीत दिला आहे.

 
मागील अनेक महिन्यापासून माहूर शहरात नगरपंचायत मार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत विविध विकासकामे सुरु आहेत. दरम्यानच्या काळात कोरोनाचा वाढता कहर पाहता जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यात ता. चार एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले असल्याने व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकएंड लॉकडाऊन घोषित करुन शासकीय बांधकामाना मुभा दिली आहे. तसेच कामावर असतांनाच कामगार जर कोरोनाबाधित निघाल्यास त्यास संपूर्ण पगार देण्याचे आदेशात नमूद केले आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीशी व त्यानिमित्य करण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलिस प्रशासनाच्या सिंघमगिरीला तोंड देत पोटाची खळगी भरण्यासाठी माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथील कामगार कृष्णा रोहिदास जाधव (वय ३०) हा माहूर नगरपंचायत मार्फत पवार कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वसमतकर महाराज मठाशेजारी सुरु असलेल्या सीसीरोडच्या कामावर (ता. सहा) रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान जात असतांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय माहूर येथे वाचक पोलिस उपनिरीक्षक पदावर असलेले शरद घोडके यांनी शहरातील रेणुकादेवी रोड थावरा नाईक यांच्या घराजवळ खाजगी वाहनाने येऊन कृष्णा जाधव या कामगाराची कॉलर पकडून उचलून खाजगी वाहनात कोंबले व पोलिस स्टेशन माहूर येथे नेऊन मारहाण केली.

कामगार कृष्णा जाधव हा त्यांना माझा गुन्हा काय असे विचारले असता त्यास त्याने काय गुन्हा केला याची माहिती सुद्धा देण्याचे औदार्य न दाखवता किंवा पोलिस स्टेशनमध्ये नेतांना अटक केल्याची नातेवाईकांना सूचना देण्याचे किंवा त्यास त्याचा काय गुन्हा हे सुद्धा कळविण्याचे महत्वाचे न समजून नियमबाह्यरीतीने त्यास उचलून खाजगी वाहनात कोंबून पोलिस स्टेशनला नेऊन सुंदरीने मारहाण करुन पोलिस ठाण्यातून हाकलून दिले. 

माझ्या मृत्यूला पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके जबाबदार असतील!

शरद घोडके पोलीस उपनिरीक्षक हे गेल्या तीन वर्षांपासून माहूर पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर होते सध्या ते उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय माहूर येथे वाचक पोलिस उपनिरीक्षक आहेत.सदर प्रकरणाची चौकशी करुन मला विनाकारण कॉलर पकडून खाजगी वाहनाने पोलिस स्टेशनला नेऊन मारहाण करून मला नाहक मनस्ताप देऊन माझी बदनामी करून मला आत्महत्या करून जीवनयात्रा संपविण्यास मजबूर करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांना त्वरित निलंबित करून मला न्याय द्यावा. अन्यथा  पंधरा दिवसात मला न्याय न मिळाल्यास कोणत्याही क्षणी आत्मदहन करून मला जीवनयात्रा संपवावी लागेल व माझ्या मरणास सर्वस्वी पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके हे जबाबदार असतील असे निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळ्से पाटील, पालकमंत्री अशोक चव्हाण, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस अधीक्षक नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, तहसीलदार माहूर, उपविभागीय पोलिस अधिकारी माहूर, प्रफुलजाधव तालुकाध्यक्ष गोर सेना तालुका माहूर व पत्रकारांना दिल्या आहेत.

पोलिस बनले राजकीय नेत्यांच्या हाताखालचे बाहुले

याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता कामगार कृष्णा जाधव हा दत्तमांजरी येथून सकाळी ८:३० च्या सुमारास ऑटोने माहूरकडे येत असतांना रस्त्यात एका शुल्लक कारणावरून येथील एका भाजप नेत्याच्या नातेवाईकाशी त्याचा वाद झाला तो वादानंतर त्यांनी आपसी समझोता करून मिटविला परंतु माहूर येथे आल्यानंतर सदरील भाजपा नेत्याच्या भावाने उपविभागीय पोलिस अधिकारी माहूर यांचे वाचक शरद घोडके यांना फोन करून बोलावून घेतले व त्याच्या समक्ष सदर कामगारास कॉलरला धरून उचलून खाजगी वाहनात कोंबून पोलीस स्टेशनला नेऊन मारहाण करून हाकलून दिले असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत कामगार कृष्णा जाधव हा माहूर पोलीस स्टेशन येथे सायंकाळी ४ वाजता पासून ते ८ वाजेपर्यत तक्रार देण्यासाठी हजर असतांना त्याची तक्रार स्वीकारण्यास स्पष्ट नकार देण्यात आले. ही बाब काही समाजसेवकांना कळल्यानंतर रात्री उशिरा अंदाजे ९:३० ते १० वाजता माहूर पोलिसांनी तक्रार स्वीकारली असल्याची बाब समोर आली आहे. सदरक्षणाय खलनिग्रहनाय असे ब्रीद असणारी पोलिस यंत्रणा सर्वसामान्य जनतेसाठी नसून राजकीय नेते व त्यांच्या नातेवाईकासाठीच आहे की, काय असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत असताना पोलिस राजकीय नेत्यांच्या हाताखालचे बहुल बनल्याची प्रचिती माहूर शहरात आली आहे. 
  
मी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा सामान्य नागरिक आहे. माझ्या आजवरच्या आयुष्यात मी कधीही कायद्याचा भंग केलेला नसून चारित्र्यसंपन्न व स्वाभिमानाने जीवन जगणारा व्यक्ती आहे. आजपर्यंत माझ्या गावात किंवा कुठेही मला एवढी अवमानकारक वर्तणूक कुणीही केलेली नसल्याने या प्रकाराने माझा आत्मसन्मान दुखावला गेला आहे. सदर प्रकाराने माझी समाजात नाहक बदनामी झाली असून माझ्या बाबत समाजात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या उलटसुलट चर्चेने मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे. आपण एवढ्यावरच थांबणार नसून मानवी हक्काचे उल्लंघन करून मला अमानवी वागणूक दिल्याबदल मानव हक्क आयोगाकडे सुद्धा दाद मागणार आहे.

- कृष्णा रोहिदास जाधव, दत्तमंजरी,माहूर.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com