

Nanded News
esakal
माहूर: काय सांगावं बाबा, पाण्यासाठी लय हाल व्हायले आमचे...सकाळपासून घागर घेऊन हिंडावं लागतं, विहिरीवर गेलं तर तिथं बी पाणी नाही, घरचं कामधंदा सोडून आम्हाला पाण्यासाठीच वणवण भटकंती करावी लागत हाय. लेकराबाळांना पाजायला बी पाणी मिळणं मुश्कील झालंय. सरकारनं आमच्याकडं लक्ष द्यावं, नाहीतर अजून आमचं लय हाल होतील. मायबाप सरकारने काय नाही दिलं तरी चालल, पाणी पाजलं तेवढंच उपकार होईल, अशी पाणीबाणीची व्यथा पाचुंदा येथील एका वृद्ध महिलेने ‘सकाळ’कडे व्यक्त केली.