

Legacy Continues: New Mahant Vows to Uphold Traditions of Mahurgad's Sacred Seat
Sakal
माहूर : राज्यभर प्रसिद्ध असलेले नांदेड जिल्ह्यातील पवित्र देव भूमी माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थानच्या महंत पदी डॉ.धनेश्वर भारती ऊर्फ योगी शाम भारती महाराज यांची ३१ सावे महंत म्हणून निवड करण्यात आली आहे.धार्मिक परंपरेनुसार झालेल्या या निवडीमुळे दत्त संप्रदायातील भक्तांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.महंत परंपरेतील ३० सावे महंत परमपूज्य मधुसूदन भारती महाराज यांना काल (ता.५) रोजी देवाज्ञा झाली,त्या पार्श्वभूमीवर परंपरेनुसार प्रारंभी गादीवर महंतांची निवड करावी लागते डॉ.धनेश्वर भारती उर्फ योगी शाम महाराज भारती यांची निवड करण्यात आली आहे.ईश्वर चिठ्ठी द्वारे सलग तिन्ही वेळा त्यांची निवड झाल्याने ही निवड दैवी संकेत मानली जात असून तत्पश्चात महंत श्री मधुसूदन भारती यांचे पार्थिव देहावर अंतिम संस्कार पार पडले.