

Nanded-Waghala Elections: NCP Fails to Make Impact
sakal
नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, पक्षाचा ‘घड्याळी’चा गजर अवघ्या दोन जागांवरच थांबला आहे. महापालिकेत थेट सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या स्थानिक नेते तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची महत्त्वाकांक्षा निकालातून धुळीस मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.