Crimesakal
नांदेड
Kinwat Crime : अनैतिक संबंधातून खून; अर्धवट जळलेला मृतदेह आढळला, दोन संशयित अटकेत
किनवट तालुक्यातील पिंपळगाव जंगलात शनिवारी (ता.सात) अर्धवट जळलेला व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.
मांडवी - किनवट तालुक्यातील पिंपळगाव जंगलात शनिवारी (ता.सात) अर्धवट जळलेला व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.