नांदेड : अक्षय्य तृतीयेनिमित्त बुधवारी (ता. ३०) नांदेड शहरातील फळ बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली. आंब्यासारख्या राजस फळाला विशेष प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारचे आंबे विक्रेत्यांनी बाजारपेठेत आणले आहेत. बाजारात अक्षरशः आंब्याचा उत्सवच पाहायला मिळाला..हापूस, केशर आणि दशहरी या प्रमुख जातींच्या आंब्यांना ग्राहकांनी प्राधान्य दिले. विशेषतः हापूस आंब्याच्या दरात यंदा मोठी वाढ झाली असून, तो ७०० ते १००० रुपये डझन दराने विकला जात होता. हापूसचा दर्जा आणि सुगंध लक्षात घेता ग्राहकांनी त्यासाठी अधिक खर्च करण्यास मागेपुढे पाहिले नाही..दुसरीकडे, केशर आणि दशहरी या प्रकारांचे दर तुलनात्मकतः कमी होते. हे आंबे १२० ते १८० रुपये डझन दराने सहज उपलब्ध होते. स्थानिक व इतर सामान्य प्रकारचे आंबे १०० ते १५० रुपये प्रति किलो या दराने विकले जात होते..शहरातील मुख्य बाजारपेठा, फळ गल्ली व रस्त्यालगतच्या परिसरात सकाळपासूनच आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे बाजारपेठेत दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. अक्षय्य तृतीयेला केल्या जाणाऱ्या गोड जेवणात आम रसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे फळ खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. उन्हाळ्यात आंब्याला असणारी पारंपरिक मागणी सणानिमित्ताने अधिकच वाढली..Nanded Crime : दगडाने ठेचून पत्नीची हत्या करणारा अटकेत; क्लिष्ट प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा, २० ते २५ दिवसांपूर्वीचा गुन्हा.अक्षय्य तृतीयेनिमित्त आंब्याला बाजारात जोरदार मागणी असून, हापूस आंब्याला ग्राहकांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच आंब्याच्या खरेदीस सुरुवात झाली असून, उलाढालही लक्षणीय आहे. यंदा उत्पादनात थोडी घट असल्याने दर काहीसे वाढले असले, तरी गुणवत्तेला प्राधान्य देत ग्राहक आनंदाने खरेदी करत आहेत. बुधवारी लाखोंची उलाढाल झाली.- बालाजी पाटील, फळ विक्रेते, नांदेड..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.