वंचित आघाडी व भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

Many activists of BJP and deprived Bahujan Aghadi from Khairgaon have joined Shiv Sena 2.jpg
Many activists of BJP and deprived Bahujan Aghadi from Khairgaon have joined Shiv Sena 2.jpg
Updated on

नांदेड : हदगाव विधानसभा मतदार संघातील खैरगाव (म)येथील भाजप व वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.०७) जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला अधिक प्रमाणात यश मिळाले असून विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात दाखल होत आहे. हदगाव विधानसभा मतदार संघातील खैरगाव (म) येथील शिवसेना शाखाप्रमुख कचरु पवार, उपशाखाप्रमुख गोविंद फिसके, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ लांडगे, पंढरीनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी व भारतीय जनता पार्टी मधील बबलू सदावर्ते, परभू साखरे, अंबादास अडकिने, नारायण थोरात, उद्धव थोरात, विकास थोरात, विजय धवसे, प्रभू फीसके, भीमराव थोरात आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी सर्व कार्यकर्त्यांचा हार घालून सत्कार केला. शिवसेना पक्ष हा जातीवादी नसून मराठी माणसावर अन्याय होत असेल तर त्यांच्या विरोधात लढणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर बहुजन समाजाच्या हितासाठी विविध योजना राबवले आहेत. शिवसेना पक्षात निष्ठेने काम केल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळते, अशी अनेक उदाहरणे राज्यात घडली आहेत. मी स्वतः शाखाप्रमुख होतो, आता जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख आहे. हे केवळ शिवसेनेमध्ये होऊ शकते, असे सांगून कार्यकर्त्यांनी पक्षात निष्ठेनं काम करण्याच्या सूचना दत्ता कोकाटे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com