esakal | मराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी, कशासाठी? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळी विकास मंडळे निर्माण करावीत व विकास मंडळावर विद्यमान मंत्रिमंडळाने सुचविलेलीच नावे राज्यपालांनी द्यावीत.  

मराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी, कशासाठी? ते वाचाच

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना महामारीच्या अवघड काळामध्ये मराठवाडा व विदर्भाची गळचेपी होऊनये, यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठवाडा व अन्य विकास मंडळांना  मुदतवाढीचा प्रस्ताव ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केली आहे.

डॉ. काब्दे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील ४६ पैकी ३५ आमदारांनी व आठ खासदारांनी मराठवाडा व इतर विकास मंडळांना लवकर मुदतवाढ मिळावी म्हणून मुख्यमंत्री व राज्यपालांना पत्र पाठविलेले आहे. शिवाय प्रसार माध्यमांद्वारेही त्यांनी ही मागणी केलेली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार रावसाहेब दानवे, खासदार हेमंत पाटील, खासदार इम्तियाज जलिल, खासदार राजीव सादव, खासदार संजय जाधव, आमदार संजय बनसोडे आदींचा समावेश आहे. 

हेही वाचा - नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागन

विशेष म्हणजे खासदार चिखलीकर, पवनराजे निंबाळकर, आमदार अंबादास दानवे, खासदार हेमंत पाटील, संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची मागणी केलेली आहे. उर्वरीत काही लोकप्रतिनिधींचा ते आजारी असल्यामुळे तसेच अन्य कारणामुळे संपर्क होऊ शकला नसल्याचे डॉ. काब्दे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हे देखील वाचाच जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह महिला डॉक्टरला शरद पवारांचा फोन येतो.​

मुदतवाढीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा
महाराष्ट्र मंत्रीमंडळाने मराठवाडा व अन्य विकासमंडळाचा मुदतवाढीचा प्रस्ताव राज्यपालांकडे अद्यापही पाठविलेला नाही. कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळी विकास मंडळे निर्माण करून विकास मंडळावर विद्यमान मंत्रिमंडळाने सुचविलेलीच नावे राज्यपालांनी द्यावीत असाही विचार पुढे आलेला आहे. या अवैधानिक कारणासाठी मराठवाडा व अन्य विकास मंडळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव अडकून राहिलेला आहे.

येथे क्लिक कराच - फेसबुकवर ओळख झाली, प्रेम जुळले, लग्नही जमले, अन्... आता गेला खडी फोडायला -

घटना दुरुस्ती केल्याशिवाय कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळे विकास मंडळ अस्तित्वात येवू शकत नाही तसेच सदस्यांनी नावे ठरविण्याचाही अधिकारी संपूर्णतः राज्यपालांचाच असतो. प्रसिद्धिपत्रकावर  मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्यासह पंडितराव देशमुख, डी. के. देशमुख व संस्थेचे पदाधिकारी डॉ. के. के. पाटील, प्रा. शरद अदवंत, द. मा. रेड्डी, प्रा. अशोक सिद्धेवाड, प्रा. थोरात, प्रा. जीवन देसाई, शिवाजी नरहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 

मुदतवाढीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवावा
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढीचा प्रस्ताव राज्यपालांकडे अद्याप पाठविलेला नाही. कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळी विकास मंडळे निर्माण करावीत व विकास मंडळावर विद्यमान मंत्रिमंडळाने सुचविलेलीच नावे राज्यपालांनी द्यावीत.  
- डॉ. व्यंकटेश काब्दे (अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद)