esakal | नवरा कामावरून लवकर घरी येत नसल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

दररोज त्रासाला कंटाळून नांदेड शहरातील एका एकणवीस वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. 

नवरा कामावरून लवकर घरी येत नसल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः गोविंदनगर येथे प्रियंका गोविंद वाघमारे (ता.१९) या विवाहितेने नवरा कामावरून लवकर घरी येत नाही, म्हणून रागाच्या भरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही आत्महत्या सहा एप्रिल रोजी घडल्याचे गोविंद धोंडीबा वाघमारे यांनी पोलिस ठाण्यामध्ये माहिती दिली. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. रेडेकर तपास करत आहेत. 

इंडियन बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले 
नांदेड ः वामननगर येथील इंडियन बॅंकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (ता. सात) इंडियन बॅंकेचे वामननगर शाखेच्या व्यवस्थापिका कविता मारोती पवार यांना मध्यरात्री फोन आला. इंडियन बॅंकेचे एटएमला कोणीतरी फोडत असून पैसे चोरून नेत आहेत. त्यामुळे कविता पवार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता चोरट्यांनी एटीएम मशीन फोडल्याचे दिसून आले. त्यानुसार भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्री. घाटे तपास करत आहेत. 

हे देखील वाचा - नांदेड आरटीओ कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; कार्यालय 30 एप्रिलपर्यत बंद

घरातून मोबाईल चोरीला 
नांदेड ः बालाजीनगर येथील सुभाषचंद्र साहेबराव गजभारे यांच्या घरातून चोरट्यांनी पोको, एमटूप्रो आणि विवो-२९२१ कंपनीचे २५ हजार रुपये किमतीचे मोबाईल हॅ्ण्डसेट चोरून नेले आहे. सहा एप्रिल रोजी ही चोरी झाल्याचे सुभाषचंद्र गजभारे यांनी ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून, श्री. लोखंडे तपास करत आहेत. 
 
महिलेच्या पर्समधील रक्कम चोरली 
नांदेड ः नंदीग्राम सोसायटी, तानाजीनगर येथील दुर्गा विशाल चौधरी (वय ३६) या भुसार माल खरेदीसाठी कमल ट्रेडींग कंपनी जुना मोंढा येथे बुधवारी (ता.सात) गेल्या होत्या. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील रोख १५ हजार रुपये चोरून नेल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्यांनी वजीराबाद पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून, तसा गुन्हाही दाखल झाला आहे. श्री. शिंदे तपास करत आहेत. 

जिल्ह्यात ४१ हजारची देशी-विदेशी दारु जप्त 
नांदेड, ता. ८ ः लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील अत्यावशयक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यामध्ये बियर बार आणि वाईन शॉपचाही समावेश आहे. त्यामुळे विनापरवाना चोरून जिल्ह्यात देशी व विदेशी दारु विक्रीचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी (ता.सात) जिल्ह्यातील रामतीर्थ, धर्माबाद, नांदेड ग्रामीण, मुखेड आणि वजीराबाद पोलिस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून ४१ हजार ९२६ रुपयांची दारु जप्त करून, विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

येथे क्लिक कराच - मांसाहरीसाठी गुड न्यूज : अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण, मटण, अंडी व मासे दुकानांचा अंतर्भाव

रामतीर्थ ठाण्याचे पंडित रामजी राठोड यांनी खतगाव समाज मंदिराच्या पाठीमागे दोन हजार ७५६ रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. धर्माबाद ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांनी इंदिरा गांधी इंग्रजी हायस्कूलजवळ १८ हजार ९५० रुपयांची विदेशी दारु तर शेषेराव भिमराव कदम यांनी महाराजा बिअर बारच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत ११ हजार ९७० रुपयांची विदेशी दारु जप्त केली आहे. तसेच नांदेड ग्रामीण ठाण्याचे शामसुंदर गंगाधर नागरगोजे यांनी ढवळे काॅर्नर ते दुध डेअरी रोडवर चार हजार २०० रुपयांची विदेशी दारु जप्त केली आहे. याशिवाय मुखेड ठाण्यातील योगेश रमेशराव महिंद्रकर यांनी वाघोबाची खारी येथे एक हजार ८०० रुपयांची तर वजीराबाद ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल पंढरी पन्हाळकर यांनी गोवर्धनघाट रोडवर दोन हजार २५० रुपयांची विदेशी दारु जप्त केली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील इतरही बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image