मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा धडकला किनवट एसडीओ कार्यालयावर

रेल्वे स्थानकावरुन फेरीच्या स्वरुपाने आंदोलनांची सुरुवात झाली. जिजामाता चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यलयापर्यंत फेरीकरुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
किनवट मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर
किनवट मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर

किनवट ( जिल्हा नांदेड ) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कमिटीच्या वतिने काॅ.अर्जुन आडे यांच्या नेतृत्वात गुरुवार (ता. १७) उपविभागीय अधिकारी कार्यलयावर जनतेच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

रेल्वे स्थानकावरुन फेरीच्या स्वरुपाने आंदोलनांची सुरुवात झाली. जिजामाता चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यलयापर्यंत फेरीकरुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनात जोरदार घोषनांनी परीसर दणाणूण गेला. दरम्यान, जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. जनतेच्या प्रश्नासंबंधी चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी मागण्याचा योग्य पाठपुरवा करण्याचे आश्वासन या वेळी दिले.

हेही वाचा - एका घटनेत अमेरिकन डॉलरच्या आमिषापायी सव्वा लाखाची फसवणूक तर दुसऱ्या घटनेत नांदेड शहरात एकाचा गळा आवळून खून

पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर दरवाढ, महाग होत जाणारे खाद्यतेल, देशाची बिकट झालेली अर्थव्यवस्था, तीन जनविरोधी कृषी कायदे आणि चार कामगारविरोधी श्रम संहिता रद्द करणे, रास्त हमी भावाचा केंद्रीय कायदा करा, जाहीर झालेली कर्जमाफीची अंमलबजावणी करा, खरीप हंगाम पदरात पडण्यासाठी बी- बियाणे, खते, औषधे स्वस्त दरात द्या, सर्व गरीब आदिवासींना खावटी अनुदान त्वरित वाटप करा, निराधारांच्या पेन्शनमध्ये वाढ करुन थकलेल्या रक्कमेचे त्वरित वाटप केले पाहिजे, रेशनच्या धान्याचा काळाबाजार थांबवून गोरगरीब जनतेला ते मोफत पुरवा, बांधकाम कामगार, रिक्षाचालक, घरेलू कामगार आदी कष्टकरी घटकांसाठी काही आर्थिक मदत करा, लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करा, ज्वारी मका शासकीय खरेदी केद्रं तातडीने सुरु करा, बॅंकेचे सर्व थकित पिक कर्ज प्रकरण निकाली काढा, वन जमिन, गायराणन जमिन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्यां नावे करा, इस्लापूर किनवट राज्यमहामार्गचे काम जलदगतीने पूर्ण करा, किनवट जिल्हा करुन इस्लापूर, मांडवी तालुका करा, सर्व वनजमिन, गायराण जमिनीचे पट्टे द्या, जनतेच्या या सर्व मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

येथे क्लिक करा - नऊ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला विशेष न्यायाधीश एस. एस. खरात यांनी पाठवले दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत

आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आंदोलनात मा.क.पाचे काॅ.अर्जुन आडे, काॅ.जनार्दन काळे, काॅ.खंडेराव कानडे, काॅ.स्टॅलिन आडे ,काॅ.शेषराव ढोले, काॅ.नंदकुमार मोदुकवार, मनोज सल्लावार, शिवाजी किरवले, प्रभाकर बोड्डेवार, आनंद लव्हाळे, आडेलु बोनगीर, दिलीप जाधव, पवण जेकेवाड, अंबर चव्हाण, सीताराम आडे, विशाल आडे, सुनिल राठोड, युवा सरपंच यल्लया कोतलगाम, राम कंडले, शिनु हळदे, दत्तु भंडारे, इरफान पठाण, साईनाथ लिंगपुजे, मेंढके ताई, नारायण चोपलवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com