कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात- कृषी विभाग

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात नोव्हेंबर महिना आणि त्यानंतर करावयाच्या उपाययोजना गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठीचे व्यवस्थापनाबाबत उपविभागीय कृषि अधिकारी यांनी सल्ला दिला आहे. त्या सल्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरील कापसाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.

पतंगाच्या निराराणीसाठी कामगंध सापळे दोन प्रति एकरी याप्रमाणे लावावेत. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास सामुहीक पतंग पकडण्यासाठी आठ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत. एकरी २० बोंडे तोडुन त्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव तपासावा. सरासरी आठ नर पतंग प्रति सापळा तीन रात्री आढळल्यास किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडात जिवंत अळ्या आढळल्यास रासायनिक किटकनाशक जसे की फेनव्हलेरेट २० टक्के EC  १० मिली किंवा सायपमेथ्रीन १० टक्के EC १० मिली, लाबंडा साहयालोथ्रीन 5EC १० मिली किंवा इंडोक्साकार्ब १४.५ टक्के मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के एसजी पाच मिली किंवा थायोडीकार्ब  ७५ टक्के WP २० ग्रॅम क्लोरापायरीफॉस २०टक्के इसी २० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के इसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी १० ते १५ दिवसाच्या अंतराने करावी .ज्या शेतात प्रति झाड ८-१० हिरवी बोंड असतील किंवा नवीन पात्या ,फुले व छोटे बोंड असतील तर किटनाशकाची फवारणी करावी. फवारणी अगोदर फुटलेला कापुस वेचुन घ्यावा. वारंवार एकच एक किटकनाशक व किटकनाशकाच्या मिश्रणाचा उपयोग टाळावा.

बोंडे सहन व बुरशीजन्य रोगांच्या समस्येवर उपाययोजना

सध्या पाऊस थांबलेला आहे. तापमानात घट होत आहे. अश्या अवस्थेत जिवाणुजन्य, बॅक्टेरिया असणाऱ्या आंतरिक बोंडसड जो  सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात  आढळला. ह्यानंतरच्या उर्वरीत हंगामात हया रोगाची शक्यता नगन्य असल्यामुळे  त्यासाठी उपाययोजना करण्याची गरज नाही . परंतु ओलीत असणाऱ्या कपाशीत दहीया, बुरशीजन्य करपा, बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग इ.  व्यवस्थापनासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन कार्बेडाझिम ५० डब्वल्यू पी २० ग्रॅम किंवा मेटारीम ५५ टक्के पायराक्लोस्ट्रॉबीन पाच टक्के डब्ल्यू २० ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५ टक्के इसी १० मिली किंवा ॲझोझायसट्रॉबीन १८.२ टक्के १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com