खासदार हेमंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यात बैठक, काय होते विषय...?

file photo
file photo

नांदेड : हिंगोली लोकसभा क्षेत्रातील किनवट तालुक्यातील ज्वारी व मका आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने जून महिन्यापासून खरेदी केली होती, ज्वारी खरेदीचे 30 जून पर्यंत मुदत वाढ होती मात्र तांत्रिक अडचणीमुळे  मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची ज्वारी शिल्लक असल्याने ज्वारी खरेदीची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांच्याकडे  केली.

खासदार हेमंत  पाटील यांनी सतत या मागणीचा पाठपुरावा राज्य सरकारकडे केल्यामुळे राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे ज्वारी खरेदीची मागणी केली होती. खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रकडे सुद्धा संपर्क साधून राज्य शासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे. 

मागील रब्बी हंगामात कोरोनामुळे शेतकऱ्यांचा शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते . किनवट तालुक्यात आदिवासी बहुल संख्या जास्त असल्याने राज्यसरकार आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी महामंडळाकडून   ज्वारी आणि मका खरेदी करण्यात आली होती त्यानुसार दि. १८मे २०२० ते ३०जून २०२० दरम्यान किनवट तालुक्यातील इस्लापूर आणि चिखली येथील खरेदी केंद्रावर मका ५००४८ क्विंटल आणि ज्वारी ११२९८ क्विंटल एवढी खरेदी करण्यात आली होती.

खरेदी केलेल्या मालाचे चुकारे ,पावत्या शेतकऱ्यांना दिले नव्हते

परंतु, मान्सूनच्या सुरवातीला या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने या भागातील भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा खंडित झाली होती यामुळे विहित मुदतीत खरेदीची लॉट एन्ट्री करता आली नव्हती त्यामुळे एकूण ३६७ शेतकऱ्यांची  ज्वारी ५६९४ क्विंटल आणि मका ७२६ क्विटल ची लॉट एन्ट्री बाकी होती सोबतच खरेदी केलेल्या मालाचे चुकारे ,पावत्या शेतकऱ्यांना दिले नव्हते आणि  मोठ्या प्रमाणात ज्वारी शिल्लक असल्याने  खासदार हेमंत पाटील  यांनी याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन ज्वारी खरेदीची मागणी केली तसेच केंद्रसरकाराकडे हि मागणी करावी याबाबतही राज्य सरकारला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते.

शेतकऱ्यांच्या समस्येबाबत सदैव जागरूक राहून कार्य करणार

त्यानुसार खासदार हेमंत पाटील यांनी केंद्राच्या अन्न पुरवठा विभागाकडे मागणी करून तातडीने हि मागणी मंजूर करण्याची विनंती केली. मतदार संघातील शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित लक्षात घेऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती पाहून तातडीने या मागणीचा पाठपुरावा खासदार हेमंत पाटील यांनी केला जगाचा पोशिंदा अडचणीत तर देश अडचणीत हr भावना खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त करून शेतकऱ्यांच्या समस्येबाबत सदैव जागरूक राहून कार्य करणार असल्याचे हr खासदार हेमंत पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com