मेघाच्या स्वप्नांना हवेय आर्थिक मदतीचे पाठबळ; साईप्रसाद ग्रुपचे शेतकऱ्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी मदतीचे आवाहन 

शिवचरण वावळे
Wednesday, 23 December 2020

शिवाजी चाटे यांच्यापुढे खरी कसोटी होती ती मुलीच्या शैक्षणिक खर्चाचा ताळमेळ बसवण्याची. भावंडांचे शिक्षण मुश्किलीने पूर्ण केले जाणार होते आणि त्यामुळे मेघाच्या वैद्यकीय शिक्षणाचा लाखोंचा खर्च करणे शिवाजींना आवाक्याबाहेर आहे.

नांदेड - सद्यस्थितीत शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना खरतर कुटुंबाचे संगोपन करतानाच दमछाक होते. मुलांचे शिक्षण, घर चालवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक मुले शाळेनंतर वडिलांना शेतीच्या कामात मदत करतात, अशा कठिण परिस्थितीत देखील शेतकऱ्यांचे मुले ९० टक्क्यापर्यंत मार्क घेतात. तरीही त्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलीचे पैशाअभावी वैद्यकीय शिक्षण थांबले असून, तिला मदतीची गरज आहे. 

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मधील चिखली या गावातील शिवाजी चाटे हे एक अल्पभूधारक शेतकरी. तीन एकर जमीन आणि दोन म्हशी एवढेच काय उपजीविकेचे साधन. त्यात दोन मुली व एक मुलगा आणि पत्नी अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालवायचा असा प्रश्न. शिवाजी चाटे हे स्वतःच्या शेतीसह इतरांच्या शेतीतही मोलमजुरी करतात, त्यांची मेघा चाटे नावाच्या मुलीने तिच्या भावंडासह गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन दहावीला ९१ टक्के, तर बारावीनंतर नीटची (वैद्यकीय पात्रता) परीक्षा दिली. त्यात ५२० मार्क मिळवून सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएसला’ प्रवेशही मिळाला. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील ७४६ अंडवृद्धीच्या रुग्णांवर लवकरच शस्त्रक्रिया ​

वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर 

शिवाजी चाटे यांच्यापुढे खरी कसोटी होती ती मुलीच्या शैक्षणिक खर्चाचा ताळमेळ बसवण्याची. भावंडांचे शिक्षण मुश्किलीने पूर्ण केले जाणार होते आणि त्यामुळे मेघाच्या वैद्यकीय शिक्षणाचा लाखोंचा खर्च करणे शिवाजींना आवाक्याबाहेर आहे. त्यात दर दोन-तीन वर्षानंतर सातत्याने दुष्काळ पडल्याने शेतीतही पुरेसे उत्पन्न कधी निघतच नाही. कधीकधी कर्जबाजारी व्हावे लागते. या सर्व विवंचनेत सध्या मेघा व तिचे वडील हतबल आहेत. 

हेही वाचले पाहिजे - जास्त दराने सिलेंडरची विक्री केल्यास तक्रार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन​

तिच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी खारीचा वाटा उचला 

मेघाला डॉक्टर करण्यासाठी अहमदपूर येथील साईप्रसादचे सदस्य सीए.विवेक बेंबडे यांनी या कुटुंबाबद्दल संपूर्ण माहिती घेतली आणि या कुटुंबाला मदतीची गरज आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अन्नदात्या शेतकऱ्यांना मदत करुन चांगले जीवन जगता यावे यासाठी समाज म्हणून आम्ही सर्वांनी मेघाच्या शिक्षणासाठी मदत करणे गरजेचे आहे. तिच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी आपणही आपला खारीचा वाटा उचलून चाटे कुटुंबाला सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. 

तीन दिवसांत मदत करण्याचे आवाहन 

मेघाला वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाच्या शिक्षणासाठी एक लाख २५ हजारांची आवश्यकता आहे. आपणापैकी ज्यांना मदत करावयाची इच्छा आहे. कृपया त्यांनी लवकर कळवावे. प्रवेश प्रक्रिया तीन दिवसांमध्ये पूर्ण करावयाची आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megha's dreams need financial support; Saiprasad Group appeals for help for medical education to a farmer's daughter Nanded News