पूर्वसूचनेशिवाय तोडण्यात आलेले कृषीपंप वीज जोडणी पूर्ववत जोडा

MLA Bhimrao Keram warns MSEDCL to reconnect power pumps which were disconnected without prior notice..jpg
MLA Bhimrao Keram warns MSEDCL to reconnect power pumps which were disconnected without prior notice..jpg

वाई बाजार (नांदेड) : माहूर किनवट तालुक्यात महावितरण कंपनीच्या विद्युत वितरण विभागाने पूर्वसूचनेशिवाय ऐन रब्बी हंगामात कृषी पंप विज जोडण्या तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण विभागाच्या या बेदरकार धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांच्या बाजूने वज्रमूठ करून पूर्वसूचना तसेच बिल दिल्याशिवाय तोडण्यात आलेले कृषी पंप विज जोडणी पूर्ववत करण्यात आले नाही. तर आंदोलनात्मक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आमदार भीमराव केराम यांनी महावितरण कंपनीला दिला आहे.

कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० अंतर्गत वीज मंडळाने वीज जोडणीसाठी नवीन नियम लागू करून कृषी पंपाची सक्तीने वीज बिल वसुली करण्यास सुरुवात केली आहे. ५० टक्के वीज बिल माफीचा गाजर देऊन शेतकऱ्यांवर लादलेल्या अव्वाच्या सव्वा बिले वसूल करण्यासाठी महावितरण रडीचा डाव खेळत आहे. आधी ३ एचपी साठी तीन हजार व ५ एचपी पाच हजार रुपये इतके वीज बिल आकारण्यात येत होते. परंतु आता नव्या नियमानुसार ३ एचपीसाठी साडेचार हजार व ५ एचपीसाठी सहा हजार पाचशे रुपये एवढे वीज बिल आकारून सक्तीची वसुली केली जात आहे. व ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही, अशा शेतकऱ्यांची कृषिपंपाची वीज जोडणी तोडण्यास सुरुवात केली आहे. 

या विषयावर आमदार भीमराव केराम यांना विचारले असता ते म्हणाले की, महावितरण विभागाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना,जाहीर प्रगटन प्रसिद्ध न करता शिवाय शेतकऱ्यांना थकबाकीची वीज देयके न देता कृषी पंपाच्या वीज जोडण्या तोडण्यास सुरूवात केली आहे. विचारणा केली असता सांगितले जाते की, आम्ही सोशल मीडियावर ही माहिती प्रसारित केली. या बातमीवर आमदार भीमराव केराम यांनी तीव्र प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांसोबत पोर खेळ लावलाय काय?सर्व शेतकरी व्हाट्सअप, फेसबुक वापरतात का? कृषी पंपाचे लाखो रुपयाचे वीजबिल थकीत आहेत. 

एकीकडे सरकारमधील मंत्री वीजबिल माफीची घोषणा करतात आणि दुसरीकडे त्यांच्या वीज वितरण कंपन्या सक्तीने बिल वसुलीसाठी वीज जोडण्या तोडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा बेगडी रूप सर्व जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. ऐन रब्बीच्या हंगामात पिकांना पाण्याची गरज असताना कृषी पंपाचे कनेक्शन तोडायला लावणे हे पाप आघाडी सरकार कुठे फेडणार. महावितरण विभागाने मागील दोन दिवसात किनवट माहूर तालुक्यातील कृषी पंपाच्या तोडलेल्या कृषी पंपाच्या वीज जोडण्या पूर्ववत केल्या नाही. तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार भीमराव केराम यांनी दिला आहे.

संतप्त शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

महावितरण विभागाने कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कृषी पंपाच्या वीज जोडण्या तोडायला सुरुवात केली आहे. महावितरण कंपनीने विज बिल देयक व वीज जोडणी तोडण्याच्या कार्यक्रमामध्ये शिथिलता आणली नाही. तर किनवट, माहूर तालुक्यातील शेतकरी एकत्र येऊन सामूहिक आंदोलन करण्याची शक्यता असून जर हे आंदोलन वास्तवात घडले तर या घटनेचा खामियाजा महावितरण कंपनीला निश्चितच भोगावा लागेल हे मात्र खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com