esakal | आमदार बोर्डीकरांनी नितीन गडकरींचे आभार मानले

बोलून बातमी शोधा

meghana bordikar
आमदार बोर्डीकरांनी नितीन गडकरींचे आभार मानले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : जिंतूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी बेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी देशाचे रस्ते व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी जिंतूर मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रस्त्यांची दयनीय अवस्था त्यांच्या निदर्शनास आणून देत रस्त्याच्या कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे प्रस्ताव त्यांना सादर केले. त्याची विनाविलंब दखल घेऊन मंत्रीमहोदयांनी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्राधान्याने खालील दर्शविलेली कामे मंजूर केली आहेत.

हेही वाचा -

यामध्ये प्रामुख्याने सेलु तालुक्यातील मोरेगाव, हातनूर, वालुर व जिंतूर तालुक्यातील कौसडी, वस्सा रस्त्यांसह वझर- बुद्रुकजवळ पूर्णा नदीवरील पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे. या कामांसाठी एकूण ४२ कोटी २२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आणि. बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयाकडून प्राप्त झाली.

सदरील कामे पूर्ण झाल्यावर या भागातील जनतेला दळणवळणासाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच पूर्णा नदीवरील पुलाचे बांधकाम झाल्यास विदर्भ आणि मराठवाडा अत्यंत कमी अंतराने जोडला जाईल. नागपुर- मुंबई समृद्धी महामार्गास जोडण्याकरिता या पुलाचा निश्चितच फायदा होईल. याप्रमाणेच मतदार संघातील उर्वरित रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात आमदार मेघना बोर्डीकर यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्तावित केलेल्या कामांनाही टप्याटप्याने मंजुरी देण्याचे आश्वासन आमदार मेघना बोर्डीकर यांना दिल्याचे सांगितले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे