Nanded News : दौऱ्याच्या नावाखाली गैरहजेरी करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना आमदार चिखलीकर यांची तंबी; सुधारणा न झाल्यास कारवाई

Prataprao Chikhalikar: लोहा-कंधार कृषी विभागाच्या कामकाजावर आमदार चिखलीकर नाराज; खरीप आढावा बैठकीत प्रशासनाला सुनावले
Nanded News
Nanded NewsSakal
Updated on

लोहा : मागील पाच वर्षांत लोहा-कंधार तालुका कृषी विभागाला मरगळ आली आहे. दौऱ्याच्या नावाखाली कार्यालयात काही कर्मचारी दांडी मारतात, तर कोणी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. शेतकऱ्यांना शेती बांधावर जाऊन मार्गदर्शन करत नाहीत. दोन अधिकारी आणि त्याच्या काही कर्मचाऱ्यांचे काम असमाधानकारक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com